---Advertisement---

PBKS vs CSK: या क्षणानं फिरवलं सामना, चेन्नईच्या पराभवाचं टर्निंग पॉइंट!

---Advertisement---

IPL 2025: पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 18 धावांनी पराभव केला. या सामन्यातही एमएस धोनी चेन्नईला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला आहे. पहिल्या डावात खेळताना पंजाबने 219 धावांचा मोठा स्कोअर केला होता, ज्यामध्ये सर्वात मोठे योगदान प्रियांश आर्यच्या 103 धावांच्या शतकाचे होते. मोठ्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्ज संघाला फक्त 201 धावा करता आल्या आणि त्यांना 18 धावांनी सामना गमावावा लागला.

या सामन्यात सीएसकेने शानदार सुरुवात केली. संघाने पहिल्या सहा षटकात विकेट न गमावता 60+ धावा केल्या. संघाला 7व्या षटकात पहिला धक्का बसला रचिन रवींद्र 35 धावा करुन बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमावर आलेल्या गायकवाडने देखील विशेष काही केले नाही. तो 1 धाववर बाद झाला. मधल्या 7-16 षटकात चेन्नई मागे पडली. संघाने आवश्यक धावगतीने धावा काढल्या नाहीत. मधल्या षटकात डेव्हाॅन कोनवे आणि शिवम दुबे यांनी सिंगल-डबलवर जोर दिला. ते मोठे फटके मारण्यात अयशस्वी ठरले. ज्यामुळे डेथ ओव्हर्समध्ये संघावार दबाव वाढला.

जेव्हा चेन्नईला धावगती वाढवण्याची गरज होती, तेव्हा 16व्या षटकात शिवम दुबे 42 धावांवर बाद झाला. चेन्नईला विजयासाठी 25 चेंडूत 69 धावांची आवश्यकता असताना दुबे बाद झाला. कॉनवे 69 धावांवर रिटायर झाला, त्याच्या जागी रवींद्र जडेजा फलंदाजीला आला. सीएसकेचा हा निर्णय कदाचित उशिरा आला, जो शेवटी त्यांच्या पराभवाचे कारण बनला. परिस्थिती अशी होती की चेन्नईला शेवटच्या 3 षटकांत 59 धावांची आवश्यकता होती. आवश्यक धावगती खूप जास्त झाली होती.

डेथ ओव्हर्समध्ये पंजबाने शानदार गोलंदाजी केली. संघाने सीएसकेला 201 धावांवर रोखले. एमएस धोनीने काही चांगले स्ट्रोक खेळून सामना जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्याला समोरून पाठिंबा मिळाला नाही. तथापि, जलद धावा काढण्याच्या प्रयत्नात, तो 12 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. त्याच्या बाद झाल्याने सामना तिथेच संपला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---