---Advertisement---

चिन्नास्वामीत RCBची दिवाळखोरी, पंजाबने दिला घरच्या मैदानावर जोरदार दणका

---Advertisement---

आयपीएलच्या 18 व्या वाढदिवसानिमित्त रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पावसामुळे व्यत्यय आलेल्या 14 षटकांच्या सामन्यात पंजाब किंग्जने आरसीबीचा 5 गडी राखून पराभव केला. पुन्हा एकदा आरसीबी घरच्या मैदानावर हरली आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 95 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पंजाब किंग्जने 12.1 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. पंजाबकडून सुरुवातीला गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली, नंतर फलंदाजीत नेहल वढेराने 19 चेंडूत नाबाद 33 धावांची महत्त्वाची खेळी केली. या विजयासह, पंजाब किंग्ज आता पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

14 षटकांत 96 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही. पहिली विकेट तिसऱ्या षटकात 22 धावांवर पडली आणि नंतर नियमित अंतराने विकेट पडत गेल्या. प्रभसिमरन सिंग 9 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर प्रियांश आर्य 16 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार श्रेयस अय्यरही फ्लाॅप ठरला. त्यानंतर जोश इंगलिस 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

जेव्हा पंजाबने 8 षटकांत 53 धावांत 4 विकेट गमावल्या तेव्हा असे वाटत होते की ते सामना उलट करतील पण नेहल वधेराने अप्रतिम फलंदाजी करत सामना पंजाबच्या बाजूने वळवला. नेहल वधेराने 19 चेंडूत 33 धावा करत नाबाद राहिला. ज्यात त्याने 3 चौकार आणि 3 षटकार आले.

पावसामुळे 14 षटकांच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली. फिल सॉल्ट (4) आणि विराट कोहली (1) लवकर बाद झाले. रजत पाटीदारने काही फटकेबाजी केली, पण 23 धावांवर बाद झाला. टिम डेव्हिडने अखेरच्या षटकात तुफानी खेळी करत 26 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप, ब्रार, चहल आणि जानसेन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---