इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 34 व्या रोमांचक सामन्यात, पावसामुळे जवळपास दोन तासांचा विलंब झाला, तरीही पंजाबच्या संघाने शानदार गोलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर विजय मिळवला.
सामन्यात, पंजाबच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दबदबा कायम ठेवला. विशेषतः मार्को जॅनसेन याने आपल्या भेदक गोलंदाजीने आरसीबीच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले. त्याने 3 षटकांत केवळ 10 धावा देत 2 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतले. त्याच्या अचूक आणि वेगवान गोलंदाजीसमोर आरसीबीच्या फलंदाजांना धावा करणे कठीण झाले. युझवेंद्र चहलने देखील प्रभावी गोलंदाजी करत 11 धावांमध्ये 2 विकेट्स घेतल्या. या दोघांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे आरसीबीची फलंदाजी पुरती ढेपाळली आणि नवव्या षटकापर्यंत त्यांनी 42 धावांवर 7 विकेट्स गमावले.
आरसीबीकडून टिम डेव्हिडने एकाकी झुंज देत अर्धशतक झळकावले आणि संघाला त्यांच्या नीचांकी धावसंख्येपासून वाचवले. मात्र, त्याला इतर कोणत्याही फलंदाजाची म्हणावी तशी साथ मिळाली नाही.
या विजयामुळे पंजाबचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर आरसीबीला या पराभवामुळे चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. मार्को जॅनसेनच्या प्रभावी गोलंदाजीने पंजाबच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
.@PunjabKingsIPL's red is shining bright in Bengaluru ❤️
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2025
They continue their winning streak with an all-round show over #RCB 👏
Scorecard ▶ https://t.co/7fIn60rqKZ #TATAIPL | #RCBvPBKS pic.twitter.com/NOASW2XRMD