आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा खेळ अत्यंत निराशाजनक झाला. त्यामुळे आता या संघात मोठे बदल होणार आहेत. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचे कर्णधार रुतुराज गायकवाड यांनी चेन्नईत बैठक घेतली असून, बदलांची तयारी सुरू आहे. धोनीने एका कार्यक्रमादरम्यान याबाबत संकेतही दिले होते. अशा परिस्थितीत असे म्हटले जात आहे की पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या सीएसके संघातून ऑक्शनपूर्वी 10 खेळाडूंना रिलीज केले जाऊ शकते.
आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघ 10 खेळाडूंना रिलीज करू शकतो. यात आर. अश्विन 9.75 कोटी, डेवोन कॉन्वे 6.25 कोटी, रचिन रवींद्र 4 कोटी, राहुल त्रिपाठी 3.4 कोटी, सॅम करन 2.4 कोटी, गुरजपनीत सिंग 2 कोटी, नॅथन एलिस 2 कोटी, दीपक हुड्डा 1.75 कोटी, जेमी ओव्हर्टन 1.5 कोटी आणि विजय शंकर 1.2 कोटी यांचा समावेश आहे. या खेळाडूंमध्ये काहींनी मागील हंगामात फारच निराशाजनक कामगिरी केली होती, तर काहींना संघातील संतुलनामुळे संधी मिळू शकली नव्हती.






