---Advertisement---

IPL 2026: 25 कोटींच्या अष्टपैलू खेळाडूची गोलंदाजी नेमकी कधी बघायला मिळणार? मोठी अपडेट समोर!

On: बुधवार, एप्रिल 8, 2026 6:47 PM
---Advertisement---

आयपीएल (IPL) 2026 मध्ये आतापर्यंत केवळ फलंदाजी करताना दिसलेला 25 कोटींचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमरन ग्रीन (Camron Green) याच्या गोलंदाजीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता चाहत्यांना त्याची गोलंदाजी पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) मोठा दिलासा मिळू शकतो.

रिपोर्ट्सनुसार, 9 एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात ग्रीन गोलंदाजी करताना दिसू शकतो. आयपीएल 2026 चा हा एक महत्त्वाचा सामना असेल, जिथे केकेआरला विजयाची नितांत गरज आहे. ग्रीनने IPL 2026 च्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये एकही ओव्हर टाकली नव्हती. याचे कारण त्याची लोअर-बॅक इंजरी (पाठदुखी) होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आधीच स्पष्ट केले होते की, स्पर्धेच्या सुरुवातीला तो फक्त फलंदाज म्हणून खेळेल आणि 10-12 दिवसांनंतर गोलंदाजीसाठी तयार होईल. आता तो कालावधी पूर्ण झाला असून ग्रीन पूर्णपणे फिट असल्याचे मानले जात आहे.

ग्रीनने गोलंदाजी न केल्यामुळे KKR च्या संघाचे संतुलन बिघडले होते. संघ आधीच खेळाडूंच्या दुखापतींमुळे अडचणीत आहे मुस्तफिजुर रहमान संघाबाहेर आहे.
हर्षित राणा आणि आकाश दीप जखमी आहेत. सुनील नरेन आजारपणामुळे आणि वरुण चक्रवर्ती हाताच्या दुखापतीमुळे गेल्या सामन्यात खेळले नव्हते.

केकेआरने लिलावात कॅमरन ग्रीनला 25.20 कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र, त्याची आतापर्यंतची कामगिरी खराब राहिली आहे. त्याने तीन डावात केवळ 18, 2 आणि 4 धावा केल्या आहेत, ज्यामुळे त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ॲरॉन फिंचने ग्रीनच्या फॉर्मवर चिंता व्यक्त केली आहे. फिंचच्या मते, ग्रीनला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठवावे किंवा त्याला थोडी विश्रांती द्यावी. आता गोलंदाजीत पुनरागमन केल्यानंतर ग्रीन संघासाठी किती प्रभाव पाडतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. जर त्याने अष्टपैलू कामगिरी केली, तर KKR चा विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो. ही अपडेट KKR साठी दिलासा देणारी ठरण्याची शक्यता आहे. आता मैदानावर तो आपल्या टीकाकारांना कसं उत्तर देतो, हे पाहणं रंजक ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---