राजस्थान रॉयल्स (RR) संघाने आयपीएल 2026 च्या हंगामासाठी आपल्या ‘होम ग्राउंड’बाबत मोठा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजस्थान रॉयल्स त्यांचे 4 घरचे सामने जयपूरमध्ये, तर उर्वरित 3 सामने गुवाहाटीमध्ये खेळण्यास तयार झाले आहेत.
राजस्थान रॉयल्सचे अध्यक्ष रणजीत बरठाकुर यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची भेट घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, जयपूरमध्ये सामने खेळवण्यावर एकमत झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही काळापासून राजस्थान रॉयल्स आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशन (RCA) यांच्यात मैदानावरून मतभेद सुरू होते.
गेल्या वर्षी येथे 5 सामने झाले होते, मात्र नवीन करारानुसार आता फक्त 4 सामने होतील. गेल्या वर्षी येथे 2 सामने झाले होते, आता ही संख्या वाढून 3 सामने होणार आहे.






