---Advertisement---

राजस्थान रॉयल्सची साथ संजू सॅमसनने का सोडली? अखेर त्याने सोडले मौन

On: मंगळवार, मार्च 17, 2026 1:21 PM
---Advertisement---

भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६चा हंगाम चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. केरळचा हा ३१ वर्षीय खेळाडू गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल २०२६च्या लिलावामध्ये राजस्थान रॉयल्सकडून ट्रेड होत चेन्नईच्या फ्रॅंचायजीकडे आला. त्याने नोव्हेंबर २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सची साथ सोडून चेन्नईमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. आता आयपीएल २०२६ चा हंगाम सुरु होण्याआधी त्याने त्याच्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले आहे.

तिरुवनंतपुरम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संजूने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. तेव्हा त्याने राजस्थान रॉयल्स सोडल्याचे कारण सांगितले आहे. तो म्हणाला, “मी राजस्थान रॉयल्स सोडले कारण मला वाटले की संघासोबतचा माझा काळ संपला आहे.” त्याने हे पीटीआयच्या एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

“मी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल; मात्र, मैदानावर असताना मी माझ्या भावनांना स्वतःवर वरचढ होऊ देत नाही. मी राजस्थान रॉयल्स संघ सोडला, कारण मला असे वाटले की त्या संघात माझा काळ आता संपला आहे. आता जरी माझी त्यांच्याशी गाठ पडली, तरीही मी माझे सर्वोत्तम क्रिकेट खेळेन,” असे भारतीय क्रिकेटपटू संजूने पुढे म्हटले आहे.

संजूने राजस्थानकडून ११ आयपीएल हंगाम खेळले आहेत. तो संघासाठी सर्वाधिक सामने खेळणारा आणि सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने २०१३ ते २०१५ आणि २०१८ ते २०१५ हे हंगाम राजस्थानकडून खेळले आहेत. तसेच त्याने २०१६ आणि २०१७ हे दोन हंगाम दिल्ली कॅपिटल्स (दिल्ली डेयरडेविल्य) संघाकडून खेळले होते.

संजूप्रमाणेच भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचीही स्थिती अशीच असणार. जडेजा अनेक वर्षे ‘सीएसकेचा एक प्रमुख खेळाडू राहिला आहे. त्याला संजूच्या बदल्यात अदलाबदल (trade) करण्यात आली आहे. त्यामुळे तो २०२६च्या हंगामात राजस्थानकडून खेळताना दिसणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---