---Advertisement---

आयपीएलआधी चेन्नईला झटका! जडेजाची जागा घेणारा 14 कोटींचा खेळाडू दुखापतग्रस्त

On: रविवार, जानेवारी 25, 2026 4:13 PM
---Advertisement---

इंडियन प्रिमीयर लीगचा (आयपीएल) पाच वेळेचा विजेता चेन्नई सुपर किंग्जला (सीएसके) २०२६चा हंगाम सुरू होण्याआधीच मोठा धक्का बसला आहे. लिलावामध्ये कोटींमध्ये विकत घेतलेला खेळाडू स्थानिक स्पर्धेत खेळताना दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चेन्नईने अष्टपैलू प्रशांत वीरला १४.२ कोटी रुपयांमध्ये मिनी-ऑक्शनमध्ये खरेदी केले होते. याबरोबरच तो सर्वात महाग अनकॅप्ड खेळाडू ठरला होता. त्याला रणजी ट्रॉफी २०२५-२६मध्ये खेळताना दुखापत झाली आहे. या स्पर्धेत तो उत्तर प्रदेशकडून खेळतो. त्याला शनिवारी (२४ जानेवारी) झारखंड विरुद्धच्या सामन्यात खांद्याची दुखापत झाली आहे.

क्षेत्ररक्षण करताना प्रशांतला दुखापत झाली असून तो मैदानावरून परतला. त्याची दुखापत गंभीर असून उत्तर प्रदेशच्या अंतिम अकराच्या संघात शिवम शर्मा याला स्थान दिले गेले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नव्या नियमानुसार एखादा खेळाडू गंभीर जखमी झाला असेल तर त्याच्याजागी दुसरा खेळाडू खेळवण्याची संधी असते.

प्रशांतची जखम नक्की किती गंभीर हे समोर आले नाही, मात्र काही रिपोर्ट्सनुसार त्याला कमीत कमी तीन आठवड्यांसाठी मैदानाबाहेर राहावे लागेल. चेन्नईने त्याला रविंद्र जडेजाची उणीव भरून काढण्यासाठी संघात घेतले होते. जडेजा २०२६च्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे.

प्रशांत उत्तरप्रदेशकडून खेळला असून तो युपी टी२० लीगमध्ये नोएडा सुपर किंग्जकडून खेळला. यामध्ये त्याने अष्टपैलू कामगिरी केली होती. त्याने २०२५मध्ये खेळल्या गेलेल्या युपी टी२० लीगमध्ये ३२० धावा केल्या होत्या.

तसेच प्रशांतने २३ वर्षाखालील स्टेट ए ट्रॉफीमध्येही उत्तम कामगिरी केली होती. त्याने ७ सामन्यांत ९४च्या सरासरीने ३७६ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने १९ षटकार आणि ३२ चौकार मारले होते. तसेच त्याने १८ विकेट्सही घेतल्या होत्या. यामुळे त्याला प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कारही मिाळाला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---