क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात शतक झळकावणे सोपी गोष्ट नव्हे. मुख्यतः टी -२० क्रिकेटमध्ये शतक पूर्ण करणे जरा जास्तच कठीण काम असते. या प्रकारात फलंदाजाकडे शतक झळकावण्यासाठी खूप कमी चेंडू असतात. यादरम्यान त्याला आपली विकेटही वाचवायची असते. यासह त्याला जोरदार फटकेबाजी देखील करायची असते. हेच काम आयपीएल सारख्या बड्या लीग स्पर्धेत करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. कारण या स्पर्धेत जगभरातील दिग्गज गोलंदाज सहभाग घेत असतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शतक झळकावणे सोपे नसते.
असे काही दिग्गज खेळाडू देखील आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे, परंतु आयपीएल स्पर्धेत त्यांना शतक झळकावण्यात अपयश आले आहे. चला तर जाणून घेऊया त्या खेळाडूंबद्दल.
१) गौतम गंभीर:
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीर याने आपल्या फलंदाजीने अनेक दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गौतम गंभीर ४२१७ धावांसह १० व्या क्रमांकावर आहे. गौतम गंभीरने या स्पर्धेत एकूण १५४ सामने खेळले. दरम्यान ९३ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. त्याने या स्पर्धेत ३६ अर्धशतक झळकावले, परंतु, त्याला एकही शतक झळकावता आले नाही.
२)ग्लेन मॅक्सवेल:
ऑस्ट्रेलिया संघाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने टी -२० क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तो आपल्या आक्रमक फलंदाजीने जगातील कुठ्ल्याही गोलंदाजाला अडचणीत टाकू शकतो.
तो गेली काही आयपीएल स्पर्धा खेळत आहे. तसेच सध्या तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत अनेकदा मोठी खेळी केली आहे. परंतु त्याला आतापर्यंत एकही शतक झळकावता आले नाहीये. त्याने आतापर्यंत एकूण ८९ सामने खेळले आहेत. यादरम्यान ८ अर्धशतक झळकावले असून ९५ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.(3 Legendary Batsman have not scored century in IPL)
३) एमएस धोनी :
जेव्हा जेव्हा आयपीएल स्पर्धेचा उल्लेख केला जाईल, तेव्हा तेव्हा एमएस धोनीचा उल्लेख नक्की केला जाईल. एमएस धोनीने या स्पर्धेत अप्रतिम फलंदाजीच नव्हे, तर नेतृत्वाने ही आपला ठसा उमटवला अशी. चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी सुरुवातीपासून ते आतापर्यंत धोनीने चमकदार कामगिरी केली आहे. धोनीच्या बॅट मधून अनेकदा विस्फोटक खेळी पाहायला मिळाल्या आहेत. परंतु, त्याला अजुनपर्यंत एकही शतक झळकावता आले नाही. या स्पर्धेत नाबाद ८४ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय गोलंदाजांनी केली कमाल! तब्बल ४ फलंदाजांना क्लीन बोल्ड करत पहिल्यांदाच केला ‘असा’ पराक्रम
जडेजाने इंग्लंडच्या सलामीवीराला बाद करताच कोहलीने हातानं वाजवली पिपाणी, फोटो तुफान व्हायरल
इंग्लिश धरतीवर ‘या’ भारतीय कर्णधारांनी जिंकलेत कसोटी सामने, ३ विजयांसह विराट अव्वल