fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आयपीएलमधील ‘हे’ ३ खेळाडू भारताला जिंकून देऊ शकतात टी२० विश्वचषक

3 IPL Players Who Can Play Key Role For Indian Team To Win T20 World Cup

आयपीएलने भारतीय क्रिकेट बोर्डाला एक नवीन ओळख मिळवून दिली. आयपीएलने केवळ भारताला नव्हे तर, क्रिकेट विश्वाला अनेक नवीन खेळाडू शोधून दिले आहेत. भारताबाबतीत बोलायचे झाले तर, हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्यासारखे खेळाडू आयपीएलमुळेच चर्चेत आले. एवढेच नाही तर, भारतीय संघातून बाहेर असणाऱ्या अंबाती रायडूला आयपीएल २०१८मधील दमदार प्रदर्शनामुळेच भारतीय संघात पुन्हा स्थान मिळाले होते.

सध्या आयपीएलमध्ये असे काही खेळाडू आहेत, जे प्रत्येक हंगामात चांगले प्रदर्शन करत आहेत, परंतु अजूनही त्यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. या लेखात आपण अशाच काही भारतीय खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत, जे आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करत आहेत. हे खेळाडू त्यांच्या बळावर भारताला टी२० विश्वचषक जिंकू देऊ शकतात. त्यामुळे त्यांना भारतीय संघात अवश्य स्थान द्यायला पाहिजे. 3 IPL Players Who Can Play Key Role For Indian Team To Win T20 World Cup

३. नीतीश राणा (Nitish Rana) –

नीतीश राणा हा २६ वर्षांचा युवा फलंदाज आहे. तो सध्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा प्रमुख भाग आहे. राणाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १३४.६२च्या स्ट्राईक रेटने ४७ सामन्यात १०८५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ८ अर्धशतकांचाही समावेश आहे. यावरुन कळून येते की राणा हा खूप चांगला फलंदाज आहे.

केवळ फलंदाजीतच हा खेळाडू पारंगत नाही, तर गरज पडल्यास तो फिरकी गोलंदाजीही करतो. त्याने आयपीएलमध्ये एकूण ७ विकेट्स घेतल्या आहेत.

भारताने २०११चे विश्वचषक पटकावले होते. तेव्हा भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतही कमाल कामगिरी केली होती. राणादेखील युवराजप्रमाणे विश्वचषकात महत्त्वाचा पर्याय बनू शकतो. कारण, विश्वचषकात अशा खेळाडूंची नितांत गरज आहे.

२. कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gowtham) –

कृष्णप्पा गौतम हा असा खेळाडू आहे, जो क्रिकेटच्या तिन्ही विभागात खूप चांगले प्रदर्शन करु शकतो. कृष्णप्पाने २०१८ला राजस्थान रॉयल्स संघातून आयपीएलमदध्ये पदार्पण केले होते. गतवर्षी ट्रेडद्वारे त्याला किंग्स इलेव्हन पंजाब संघात स्थान देण्यात आले.

कृष्णप्पाने त्याच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने आपल्यातील कौशल्य दाखवून दिले आहे. २०१८मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या एका सामन्यात त्याने केवळ ११ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या होत्या. शिवाय कर्नाटक प्रीमियर लीगच्या एका सामन्यात त्याने फक्त ५४ चेंडूत नाबाद १३४ धावांची धुव्वाधार शतकी खेळी केली होती. यात त्याच्या ७ चौकारांचा आणि १३ षटकारांचा समावेश होता. शिवाय याच सामन्यात त्याने १५ धावा देत ८ विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. यासह त्याने केपीएलमध्ये एका नव्या विक्रमांची नोंद केली होती. तर, त्याने सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना अनेक झेल झेलले आहेत.

मुळात कृष्णप्पा हा फिरकी गोलंदाज आहे. पण गरज पडल्यास तो वेगाने धावाही घेऊ शकतो. त्यामुळे टी२० विश्वचषकात तो महत्त्वाची भूमिका करु शकतो. भारतीय विश्वचषक संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू कमतरता तो भरुन काढू शकतो.

१. सूर्याकुमार यादव (Suryakumar Yadav) –

भारतीय संघाची सर्वात मोठी कमजोरी आहे मधली फळी आणि सूर्याकुमार यादव यासाठी एक उत्तम पर्याय बनू शकतो. सूर्यकुमार गेल्या काही हंगामांपासून मुंबई इंडियन्स संघासाठी महत्त्वाचे योगदान देत आहे. तसेच, अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी म्हटले आहे की, सूर्याकुमारला भारतीय संघात संधी मिळायला हवी.

भारतीय टी२० संघात सलामी फलंदाजांची जोडी जबरदस्त आहे. परंतु, मधल्या फळीतील फलंदाज ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे. यामुळेच भारताला २०१९मधील विश्वचषक गमवावा लागला होता. सूर्याकुमार हा मधल्या फळीतील उत्कृष्ट फलंदाज आहे. त्यामुळे तो भारतीय टी२० संघाच्या मधल्या फळीसाठी महत्वाचा पर्याय बनू शकतो.

ट्रेंडिंग लेख-

हे २ भारतीय खेळाडू, त्यांच्या टी२० कारकिर्दीत एकदाही झाले नाहीत शून्यावर बाद

‘कॅप्टन कूल’ धोनीमुळे टीम इंडियाला मिळाले हे ५ हिरे, आज क्रिकेटमध्ये…

जेलची हवा खावी लागलेले ६ क्रिकेटपटू; दोन नावं आहेत भारतीय

You might also like