इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) २६ मार्चपासून सुरू होणार आहे. यावर्षी एकूण १० संघ आमने-सामने येणार आहेत. आयपीएल २०२२ चे सर्व सामने महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई येथील ४ स्टेडिअममध्ये खेळले जाणार आहेत. संघांची २ गटात विभागणी करण्यात आली आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामात कोणत्या संघाचे नेतृत्व कोण करणार आहे, ते आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
आयपीएलमध्ये २ संघांचे नेतृत्व परदेशी खेळाडू आणि ८ संघांचे नेतृत्व भारतीय खेळाडू करतात दिसणार आहेत. आयपीएल २०२२ मधील अ गटात मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स या संघांचा समावेश आहे. तसेच, ब गटात चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स या संघांचा समावेश आहे.
चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनी आहे आणि मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. तसेच, कोलकता नाईट राईडर्स संघांचा कर्णधार श्रेयस अयर आहे. दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व रिषभ पंत करताना दिसणार आहे, तर गुजरातचे नेतृत्व हार्दिक पंड्या करताना दिसणार आहे. लखनऊ संघाचा कर्णधार केएल राहुल असणार आहे. पंजाबचा कर्णधार मयंक अगरवाल, हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन,
बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन असणार आहे. जवळजवळ सर्वच संघांचे कर्णधार निश्चित झाले आहेत. आता कोणता संघ या वर्षीचा आयपीएल कप घेऊन जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आयपीएल २०२२ ही स्पर्धा मुंबई ३ आणि पुण्याच्या १ अशा ४ स्टेडिअमवर पार पडणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये एकूण २० सामने खेळवले जाणार आहेत. ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये एकूण १५ सामने आणि डीवाय पाटील स्टेडियममध्ये आयपीएलचे २० सामने खेळवले जाणार आहेत. तसेच, पुण्याच्या एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये एकूण १५ सामने खेळवले जातील. प्ले ऑफच्या सामान्यासाठी ठिकाण निश्चित झाले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबी संघाचा कर्णधार झाल्यानंतरही फाफ डू प्लेसिसला आहे ‘या’ गोष्टीचा पश्चाताप, वाचा काय म्हणाला
‘कॅप्टन रूट’ची आणखी एका विक्रमाला गवसणी! झुंजार शतकासह दिग्गजांना पाठी सोडत पोहोचला ‘टॉप’ला