पुढील आठवड्यात जयपूर येथे 18 डिसेंबरला आयपीएल 2019चा लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठी 1003 खेळाडूंमधून अंतिम 346 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
त्यामुळे कोणत्या खेळाडूला संघात घ्यायचे याची आठही संघांनी तयारी सुरु केली आहे. पण किंग्ज इलेव्हन पंजाबने त्यांना कोणत्या खेळाडूंना संघात घ्यायचे आहे याची थेट माहिती दिली आहे. त्यांनी ही माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.
त्यासाठी त्यांनी त्यांची विश लिस्ट(संघात घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंची यादी) तयार केली आहे. यामध्ये यावर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मुक्त केलेल्या ब्रेंडन मॅक्यूलमचा समावेश आहे. तसेच मागीलवर्षी सर्वाधिक महागडा ठरलेला जयदेव उनाडकटचाही पंजाबच्या विश लिस्टमध्ये समावेश आहे. उनाडकटला राजस्थान रॉयल्सने यावर्षी मुक्त केले आहे.
त्याचबरोबर विंडीजचा आक्रमक युवा फलंदाज शिमरॉन हेटमेयरलाही पंजाब संघात घेऊ इच्छित आहे. तो मागील काही सामन्यात चांगला खेळला आहे.
याबरोबरच पंजाबचे लक्ष अक्षर पटेलवरही असणार आहे. पटेल आयपीएलमध्ये मागील काही मोसमात पंजाबकडूनच खेळत आहे. पण पंजाबच्या संघात कर्णधार आर अश्विन फिरकीपटू असल्याने त्यांनी पटेलला मुक्त केले आहे. मात्र तरीही त्याला परत संघात घेण्याचा पंजाब प्रयत्न करणार आहे.
तसेच यष्टीरक्षक वृद्धीमान सहालाही त्यांनी यावर्षी लिलावासाठी मुक्त केले असले तरी ते त्याला परत संघात घेऊ इच्छित आहेत. याच्याबरोबरच पंजाबच्या विशलिस्टमध्ये शिवम दुबे, अनमोलप्रीत सिंग, तन्मय मिश्रा, हर्ष त्यागी, कुलदीप सेन, दीवेश पठनिया यांचा समावेश आहे.
Just imagine having McCullum and Gayle opening the batting, with Hetmyer at number 3. 😱🔥#IPLAuction #IPL2019 #IPL2019Auction #KXIP #LivePunjabiPlayPunjabi
READ MORE 👇🏼https://t.co/hat2Huff97
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) December 12, 2018
मात्र या यादीत युवराज सिंगचा समावेश नाही. पंजाबने मागीलवर्षी युवराजला त्याच्या मुळ किमतीत 2 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतले होते. पण यावर्षी त्यांनी त्याला मुक्त केले आहे.
यावर्षी पंजाब संघात 15 खेळाडूंसाठी जागा रिक्त आहे. त्यांनी यावर्षी लिलावासाठी त्यांचे 11 खेळाडू मुक्त केले आहे. तसेच फक्त 9 खेळाडूंना कायम केले आहे. त्यामुळे सध्याच्या पंजाब संघात एकूण 6 भारतीय खेळाडू आणि 4 परदेशी खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांच्या संघात 11 भारतीय खेळाडूंसाठी आणि 4 परदेशी खेळाडूंसाठी जागा रिक्त आहेत.
सध्या पंजाब संघात असणारे खेळाडू –
भारतीय – आर अश्विन, केएल राहुल, मयांक अगरवाल, अंकित राजपूत, करुण नायर, मंदिप सिंग,
परदेशी खेळाडू – ख्रिस गेल, अँड्र्यू टाय, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेविड मिलर
महत्त्वाच्या बातम्या:
–सर जडेजाचा १५ खेळाडूंमध्ये एकही बेस्ट फ्रेंड नाही तर…
–हॉकी विश्वचषक २०१८: दोन वेळेच्या विश्वविजेत्या संघावर विजय मिळवत बेल्जियमची उपांत्य फेरीत धडक
–आयपीएल २०१९चा लिलाव कधी आणि कोणत्या चॅनेलवर पहाल?