मैदानावर असणाऱ्या खेळाडूंमध्ये बर्याचदा शाब्दिक चकमक होत असते, पण आजकाल मैदानाव्यतिरिक्त हे खेळाडू सोशल मीडियावरही एकमेकांबरोबर शाब्दिक बाचाबाची करताना दिसतात.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्स आणि यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेल यांच्यातही सोशल मिडीयावरती शाब्दिक चकमक झाली.
नुकत्याच 19 डिसेंबरला झालेल्या 2020 आयपीएल लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ऑस्ट्रेलियाचा मर्यादीत षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंचला 4 कोटी 40 लाख रुपयांमध्ये खरेदी केले. त्यावरुन जोन्स यांनी एक ट्विट करत बेंगलोरचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिवच्या उंचीवरून त्याच्यावर निशाणा साधला.
‘पार्थिव तुला एरॅान फिंचबरोबर सलामीवीर फलंदाजी करायला मिळत आहे तु किती नशीबवानआहेस. तो तुझ्यापेक्षा खूप उंच आहे, म्हणून आता तुला उसळी घेणाऱ्या चेंडूचा सामना करताना घाबरून जाण्याची गरज नाही. तसे, जवळजवळ सर्व क्रिकेटर्स तुझ्यापेक्षा उंच आहेत,’ अशा अर्थाचे ट्विट डिन जोन्सने केले.
How lucky are you @parthiv9 opening the batting with an Aussie @AaronFinch5 .. you life just got easier! 🤣🤣🤣 @RCBTweets
He still is taller than you… but then again.. most cricketers are! 🤣— Dean Jones AM (@ProfDeano) December 21, 2019
यावर पार्थिवनेही तिखट शब्दात उत्तर दिले. पार्थिवने प्रत्युत्तर देत ट्विट केले की, ‘मला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बरोबर खेळायला आवडले. एरॅान फिंच एक उत्तम खेळाडू आहे. त्याने जास्त वेळ ऑस्ट्रेलियामध्ये घालवला आहे. तो तुझ्यासारखा नाही. देवाचे आभार मानतो नाताळा निमित्त तू निदान तूझ्या घरी जात आहेत.’
I like to work with an Aussie…@AaronFinch5 is brilliant..and he is spending more time in Australia…unlike u @ProfDeano ..thank god u r gng home at least for Christmas…merry Christmas…😉😉
— parthiv patel (@parthiv9) December 21, 2019
पार्थिव आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळत आहे. पार्थिवने आयपीएलमध्ये आतापर्यंत 139 सामने खेळले असून त्याने 2848 धावा केल्या आहेत. यात 13 अर्धशतकांचा समावेश आहे. पार्थिव आतापर्यत चेन्नई सुपर किंग्ज, कोची टस्कर्स केरळ, डेक्कन चार्जस, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.
शार्दुल ठाकूरने फलंदाजी करताना वापरली ही खास युक्ती
वाचा- 👉https://t.co/o8zM8OfBPq👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #INDvWI
— Maha Sports (@Maha_Sports) December 23, 2019
भारताचे ४ असे गोलंदाज, ज्यांनी फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले होते
वाचा👉https://t.co/is50gOoDi1👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #INDvWI— Maha Sports (@Maha_Sports) December 23, 2019