---Advertisement---

ज्या शहरात टीम इंडियाला मारले ५ षटकार, त्याच शहराकडून मोईन अली गाजवणार आयपीएल

On: गुरूवार, फेब्रुवारी 18, 2021 4:02 PM
---Advertisement---

बहुप्रतिक्षित आयपीएल २०२१ च्या लिलावाला चेन्नई येथे प्रारंभ झाला आहे. अनेक दिवसांपासून या लिलावाची क्रिकेटप्रेमीं जोरदार चर्चा होती. या लिलावात तब्बल २९८ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आपले आजमाविण्यासाठी उतरले आहेत. इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली याने या लिलावात मोठी रक्कम मिळत त्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

माजी विजेत्यांसाठी खेळणार मोईन

नुकतीच चेन्नई येथे संपलेली भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान दुसरी कसोटी गाजवलेला इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली लिलावात महागड्या किमतीत विकला गेला. पंजाब किंग्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्यादरम्यान झालेल्या ‘बिडींग वॉर’ मध्ये चेन्नईने ७ कोटी रुपयांची बोली लावत बाजी मारली.

कसोटीतील कामगिरी आली कामी

मोईन अलीने भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान झालेल्या दुसऱ्या चेन्नई कसोटीत १८ चेंडूत ४३ धावा करून त्याने सर्वांची वाहवा मिळवली होती. त्याने या खेळीदरम्यान ५ षटकार मारले होते. त्यातील ३ षटकार त्याने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर सलग ठोकले होते.

अली यापूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळत होता. त्याने आरसीबीसाठी दोन हंगाम खेळले आहेत. याला पूर्वी संघाने त्याला करारमुक्त केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---