आयपीएल २०२१ चा लिलाव चेन्नईमध्ये गुरुवारी पार पडला. या लिलावात दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस व भारताचा अनकॅपड प्लेअर कृष्णप्पा गौतम या दोन खेळाडूंची सर्वाधिक चर्चा झाली. मॉरिस आजपर्यंतच्या आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला असून त्याला १६ कोटी २५ लाख रुपये मोजत राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या ताफ्यात सामील केले, तर कृष्णप्पा गौतमला ९ कोटी २५ लाख रुपये मोजत चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात घेतले.
या लिलावात एकूण ५७ खेळाडूंवर बोली लागली. त्यात २२ खेळाडू हे परदेशी होते. या ५७ खेळाडूंवर तब्बल १४५ कोटी रुपये वेगवेगळ्या संघांनी खर्च केले.
काईल जॅमिन्सन या खेळाडूला १५ कोटी मोजत रॉयल चॅलेंजर संघाने आपल्याकडे घेतले तर ग्लेन मॅक्सवेलवर याही वर्षी संघ उदार होताना दिसले. तब्बल १४ कोटी २५ लाख मोजत त्याला बेंगलोरने आपल्या संघात समाविष्ट केले. शाहरुख खान या भारतीय फलंदाजाला आश्चर्यकारकरित्या तब्बल ५ कोटी २५ लाख मिळाले. त्याची बेस प्राईज केवळ २० लाख होती.
आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिलेल्या मोठ्या खेळाडूंची नावं-
ऍलेक्स हेल्स, जेसन रॉय, एविन लेविस, ऍरॉन फिंच, हनुमा विहारी, ग्लेन फिलीप, ऍलेक्स कॅरे, कुसल परेरा, शेल्डन कार्टवेल, आदिल राशिद, राहुल शर्मा, इश सोहदी, कायिस अहमद, हिमांशू राणा, गहलोत सिंग, अतित शेठ,हिंमत सिंग, विष्णू सोलंकी, आयुष बदोनी, विवेक सिंग, अवी बारोत, केदार देवधर, अंकित रजपूत, मुजताबा युसूफ, कुलदीप सेन, तुषार देशपांडे, करणवीर सिंग, संदीप लामिचेन, सुदेशन मिधून, तेजस बरोका, रोवमन पॉवेल, कोरे अँडरसन, डेवन कोन्वे, डॅरेन ब्रावो, रासि वॅन डेर डुसेन, मार्टिन गप्टिल, गुरकित सिंग, मार्नस लाबुशाने, वरुण ऍरॉन, ओशाने थॉमस, मोहित शर्मा, बिली स्टानलेक, मिचेल मॅक्लघन, जेसन बेन्नड्रॉफ, नवीन उल हक, करण शर्मा, हर्ष त्यागी, केएल श्रिजाथ, बेन ड्वॉरशिव, थिसारा परेरा, बेन मॅकडेमिरिट, मेथ्थू वेड, सिन ऍबॉट, सिद्धेश लाड, तेजिंदर सिंग, प्रेराक मंकड, जोश इन्गिस, सिमरजीत सिंग, वेन पार्नेल, रिस टोप्लेय, ख्रिस ग्रीन, इशुरु उडाना, जॉर्ज लिंडे, चैतन्य बिष्णोई, अजय देव गौड, जॅक विल्डरमर्थ
चेन्नई सुपर किंग्जने लिलावात खरेदी केलेले खेळाडू
क्रिषप्पा गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, के भगथ वर्मा,, सी हरी निथांथ
दिल्ली डेअरडेविल्सने लिलावात खरेदी केलेले खेळाडू
टॉम करन, स्टिवन स्मिथ, सॅम बिलिंग्ज, उमेश यादव, रिपाल पटेल, विष्णू विनोद, लुकमन हुसेन मेरिवाला, एम सिद्धार्थ
कोलकाता नाईट रायडर्सने लिलावात खरेदी केलेले खेळाडू
शाकिब अल हसन, हरभजन सिंग, बेन कटिंग, करुण नायर, पवन नेगी, वेंकटेश आय्यर, शेल्डन जॅकसन, वैभव अरोरा
मुंबई इंडियन्सने लिलावात खरेदी केलेले खेळाडू
नेथन कुल्टर नाईल, ऍडम माल्न, पियुष चावला, जेम्स निषम, युधविर चरक, मार्को जेन्सन, अर्जुन तेंडूलकर
पंजाब किंग्जने लिलावात खरेदी केलेले खेळाडू
झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ, शाहरुख खान, मॉईस हेन्रिक्स, दाविद मालान, फाबियन ऍलेन, जलज सक्सेना, सौरव कुमार, उत्कर्ष सिंग
राजस्थान रॉयल्सने लिलावात खरेदी केलेले खेळाडू
ख्रिस मॉरिस, शिवम दुबे, चेतन साकारिया, मुश्तफिजुर रेहमान, लियाम लिविगस्टोन, केसी कारिप्पा, आकाश सिंग, कुलदीप यादव
रॉयल चॅलेंजर बेंगलोरने लिलावात खरेदी केलेले खेळाडू
काईल जॅमिन्सन, ग्लेन मॅक्सवेल, डान ख्रिस्तीन, सचिन बेबी, रजत पाटिदार, मोहम्मद अझरुद्दीन, सुयश प्रभुदेसाई, कोना स्रिकर भरत
सनरायझर्स हैद्राबादने लिलावात खरेदी केलेले खेळाडू
केदार जाधव, मुजीर झारदान, जे सुचिथ
आयपीएल २०२१ लिलावात सर्वाधिक महागडे ठरलेले खेळाडू
ख्रिस मॉरिस- १६ कोटी २५ लाख, राजस्थान
काईल जॅमिन्सन- १५ कोटी, बेंगलोर
ग्लेन मॅक्सवेल- १४ कोटी २५ लाख, बेंगलोर
झाय रिचर्डसन- १४ कोटी, पंजाब
कृष्णप्पा गौतम- ९ कोटी २५ लाख, चेन्नई
रिले मेरिडिथ- ८ कोटी, पंजाब
मोईन अली- ७ कोटी, चेन्नई
शाहरुख खान- ५ कोटी २५ लाख, पंजाब
टॉम करन- ५ कोटी २४ लाख, दिल्ली
नॅथन कुल्टर नाईल- ५ कोटी, मुंबई
शिवम दुबे- ४ कोटी ४० लाख, राजस्थान
ऍडम मिल्ने- ३ कोटी २० लाख, मुंबई
शाकिब अल हसन- ३ कोटी २० लाख, कोलकाता
पियुष चावला- २ कोटी ४० लाख, मुंबई
स्टिवन स्मिथ- २ कोटी २० लाख, दिल्ली
दाविद मालान- १ कोटी ५० लाख, पंजाब
मिश्तफिझूर रहेमान- १ कोटी, राजस्थान
उमेश यादव- १ कोटी- दिल्ली