इंडियन प्रीमीयर लीगचा (IPL) यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. या लिलावातून अजिंक्य रहाणेला नवा आयपीएल संघ मिळाला आहे.
रहाणेची १ कोटी अशी या लिलावासाठी मुळ किंमत होती. त्याला त्याच्या या मुळ किंमतीतच कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या संघात सामील करुन घेतले आहे. त्यामुळे आयपीएल २०२२ मध्ये रहाणे कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना दिसेल.
रहाणे गेल्यावर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. पण, त्याला या लिलावापूर्वी दिल्लीने संघातून मुक्त केले होते. त्यामुळे तो लिलावात सहभागी होता.
रहाणेने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १५१ सामने खेळले आहेत. यात त्याने ३९४१ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २ शतके आणि २८ अर्धशतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
चाहरला लिलावात मूळ किंमतीच्या ७ पट रक्कम, बहिण आणि होणाऱ्या पत्नीने दिली अशी रिऍक्शन
मंकडींग आऊट झालेल्या बटलरकडूनच अश्विनचं राजस्थानमध्ये स्वागत, म्हणाला, ‘काळजी नको, मी क्रिजमध्येच
‘बेबी एबी’वर चॅम्पियन संघाने लावली बोली , डिविलियर्ससह ट्विटरवर आल्या अशा प्रतिक्रिया