---Advertisement---

IPL Auction: राजस्थानचा भिडू झाला ‘दिल्लीकर’; युवा चेतन साकारीयाला लागली इतक्या कोटींची बोली

On: रविवार, फेब्रुवारी 13, 2022 2:15 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम काहीच दिवसात खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली, तर अनेक खेळाडू अनसोल्ड राहिले. १० संघांदरम्यान होत असलेल्या या लिलावात काही खेळाडूंसाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. यात युवा चेतन साकारियाचाही समावेश आहे.

गेल्यावर्षी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दमदार कामगिरी करणाऱ्या चेतनला यावर्षी दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले. त्याला ४ कोटी २० लाख रुपये दिल्लीने मोजले आहेत.

चेतनने गेल्यावर्षी राजस्थानकडून खेळताना शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचीही संधी मिळाली. त्याने १ वनडे आणि २ टी२० सामने खेळले आहेत. तसेच त्याने आयपीएलमध्ये १४ सामने आत्तापर्यंत खेळले आहेत. यात त्याने १४ विकेट्स घेतल्या आहेत.

विशेष म्हणजे गेल्यावर्षी त्याने वैयक्तिक आयुष्यातही अनेक कठीण घटनांचा सामना केला होता. त्याने त्याच्या भावाला आणि वडीलांना गमावले होते. असे असतानाही त्याने त्याच्या कामगिरीवर परिणाम होऊ दिला नव्हता.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘भारताचा बिलिनियर’ जयदेव उनाडकट यंदा मुंबईच्या ताफ्यात दाखल, पण किंमत मात्र घसरली

खलील अहमदसाठी उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सने ओतला पैसा, पाहा किती रुपयांना केले खरेदी?

अनुभवी ऑलराऊंडर्स अनसोल्ड तर नवख्या खेळाडूंनी केली कोट्यावधींची कमाई! पाहा संपूर्ण यादी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---