---Advertisement---

IPL Auction: एबीडी गेला, डू प्लेसिस आला; बेंगलोरने तब्बल ‘इतक्या’ कोटींसह केले खरेदी

On: शनिवार, फेब्रुवारी 12, 2022 12:52 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. या लिलावात लक्षवेधी चेहऱ्यांपैकी फाफ डू प्लेसिस हा एक खेळाडू देखील होता.

फाफ डू प्लेसिसला घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांमध्ये चूरस पाहायला मिळाली. पण, बेंगलोरने अखेरपर्यंत या शर्यतीत टीकून राहात डू प्लेसिसला आपल्या संघात सामील केले. डू प्लेसिसची मुळ किंमत २ कोटी रुपये होती. पण, बेंगलोर संघाने त्याला ७ कोटी रुपयांना विकत घेतले.

त्यामुळे आता यंदा एबी डिविलियर्स जरी बेंगलोर संघाकडून खेळताना दिसणार नसला, तरी त्याचा बालपणीचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेतील माजी संघसहकारी डू प्लेसिस बेंगलोर संघाकडून खेळताना दिसणार आहे. डिविलियर्सने काही दिवसांपूर्वीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

फाफ डू प्लेसिस गेल्या काही हंगामापासून चेन्नई सुपर किंग्स संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरला होता. त्याने गेल्यावर्षी हंगामात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने गेल्यावर्षी ६३३ धावा केल्या होत्या. तसेच डू प्लेसिसने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १०० सामने खेळले आहेत. त्याने यात २९३५ धावा केल्या असून २२ अर्धशतके केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल मेगा ऑक्शनबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही, घ्या जाणून एकाच क्लिकवर

मेगा लिलावात होणारी ‘एक्सेलरेशन बिडींग’ म्हणजे काय रे भाऊ?

IPL Auction 2022 | विश्वविजेत्या टीम इंडिया U19 संघातील १० खेळाडू मेगा लिलावात सामील, वाचा नावे

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---