---Advertisement---

‘इशान’ बनला लिलावाची ‘शान’, मोडले सर्वच रेकॉर्ड! विक्रमी रकमेसह मुंबईच्या ताफ्यात

On: शनिवार, फेब्रुवारी 12, 2022 4:39 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. त्यातही युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनसाठी चांगलीच टशन पाहायला मिळाली.

सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात इशान किशनसाठी चांगलीच स्पर्धा झाली. १५ कोटींपर्यंत त्याची किंमत गेल्यानंतरही हे दोन्ही संघ माघार घेण्यास तयार नव्हते. मात्र, अखेर मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटींच्या बोलीसह त्याला आपल्या ताफ्यात पुन्हा सामील करून घेतले.

इशान गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्सचाच भाग होता. मात्र, या लिलावापूर्वी संघाने त्याला मुक्त केले होते. त्यामुळे तो लिलावात सहभागी झाला होता. पण या लिलावातून मुंबईने आपला खेळाडू पुन्हा संघात परत घेतला आहे. विशेष गोष्ट अशी की मुंबईने इतिहासात पहिल्यांदाच लिलावामध्ये एखाद्या खेळाडूसाठी १० कोटींहून अधिक पैसे मोजले आहेत. यापूर्वी मुंबईने रोहित शर्मासाठी २०११ च्या आयपीएल लिलावात ९.२० कोटी रुपयांना खरेदी केले होते.

तसेच इशान किशन हा आयपीएल लिलावातील सर्वात महागडा यष्टीरक्षक देखील ठरला आहे. तर एकूण खेळाडूंमध्ये तो आयपीएल लिलावातील चौथा महागडा खेळाडू ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर ख्रिस मॉरीस आहे. त्याला १६.२५ कोटी रुपये बोली २०२१ लिलावात लागली होती. तर युवराजला १६ कोटी रुपयांची २०१५ साली आणि पॅट कमिन्सला २०२० साली १५.५० कोटी रुपयांची बोली आयपीएल लिलावात लागली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

स्वागत ‘पंड्या’जी लखनऊ में है! कृणाल पंड्यावर लागली अनपेक्षित बोली, रक्कम पाहून सर्वच चकित

ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजयाचा शिल्पकार मार्श‌ बनला ‘दिल्लीकर’

‘ह्युज एडमिड्स’ कोसळल्यावर ‘या’ व्यक्तीने लढवला आयपीएल लिलावाचा किल्ला, जाणून घ्या नव्या ऑक्शनरबद्दल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---