---Advertisement---

आयपीएल लिलावातील सर्वात रोमांचक नियम सायलेंट टाय ब्रेकर! जाणून घ्या त्याबद्दल

On: शुक्रवार, फेब्रुवारी 11, 2022 4:58 PM
auction 2022
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी टी२० लीग‌ असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा पंधरावा हंगाम (IPL 2022) मार्च महिन्यात सुरू होईल. या हंगामासाठी बेंगलोर येथे १२ व‌ १३ फेब्रुवारी रोजी मेगा लिलाव (Mega Auction) पार पडणार आहे. या मेगा लिलावात आंतरराष्ट्रीय खेळाडूपासून अनेक युवा खेळाडूंवर संघांची नजर असेल‌. या लिलावासाठी बीसीसीआय व आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने अनेक नियम (IPL Auction Rules) घालून दिले आहेत. यापैकी एक नियम असा आहे जो सर्वात कमी वेळा वापरात आला आहे. आपण त्याच नियमाविषयी म्हणजेच सायलेंट टाय ब्रेकरविषयी (Silent Tie Breaker) जाणून घेणार आहोत.

 

काय आहे हा नियम?

आयपीएलच्या लिलावात आत्तापर्यंत सर्वात कमी वेळा वापरला गेलेला नियम म्हणून सायलेंट टाय ब्रेकरकडे पाहिले जाते. हा नियम आयपीएल इतिहासात केवळ तीन वेळा वापरला गेला आहे. कायरन पोलार्ड, शेन बाँड रवींद्र जडेजा यांना खरेदी करण्यासाठी हा नियम वापरला गेला होता.

जर एखादा संघ एखाद्या खेळाडूवर बोली लावत असताना त्यांची शिल्लक रक्कम संपली असल्यास, त्याचवेळी दुसऱ्या संघाने तितकीच बोली लावली तर हा नियम वापरला जातो. यामध्ये दोन्ही संघ लिखित स्वरूपात ऑक्शनरकडे आपण लावलेल्या बोलीची रक्कम सांगतात. यामध्ये जो संघ गुप्त पद्धतीने सर्वाधिक बोली लावेल त्या संघाला तो खेळाडू दिला जातो. गुप्त पद्धतीने देखील बोली समान राहिल्यास पुन्हा अशीच प्रक्रिया वापरली जाते. पर्समधील रकमेपेक्षा अधिक रक्कम जर खेळाडूवर लावली गेली असेल तर ती रक्कम बीसीसीआयकडे जमा होते.

पोलार्डवर अशीच लागली बोली

आयपीएल २०१० वेळी वेस्ट इंडीजचा अष्टपैलू कायरन पोलार्ड याचा लिलाव अशाच पद्धतीने झाला होता. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स व चेन्नई सुपर किंग्स यांनी एकाच रकमेवर बोली लावली होती. अखेर सायलेंट टायब्रेकरमध्ये तो मुंबई संघाचा भाग बनला. याच लिलावात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज शेन बोंड याच्यासाठी देखील सायलेंट टायब्रेकर वापरला गेलेला. २०१२ आयपीएल लिलावात ही रवींद्र जडेजा याच्यासाठी मुंबई इंडियंस व चेन्नई सुपर किंग्स यांनी सायलेंट टाय ब्रेकर वापरला होता. यामध्ये तो चेन्नई संघाचा भाग बनला.

महत्वाच्या बातम्या-

फलंदाजीत फ्लॉप, तरी रोहित-शिखरने रचला इतिहास! ‘असा’ कारनामा करणारी पहिलीच सलामी जोडी 

आयपीएल लिलावापूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय! ३ खेळाडूंच्या गोलंदाजीवर बंदी, तर १० जणांवर करडी नजर 

INDvWI: तिसऱ्या वनडेत भारताने जिंकला टॉस, ११ जणांच्या संघातून केएल राहुलसह ४ खेळाडू बाहेर 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---