इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. त्याचबरोबर अनेक दिग्गज खेळाडू या लिलावात अनसोल्ड राहिलेले देखील पाहायला मिळाले. दरम्यान, भारताच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला शार्दुल ठाकूर हा देखील या लिलावात उतरला होता. त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाने विकत घेतले आहे.
वेगवान गोलंदाज असलेला शार्दुल ठाकूर तळात फलंदाजीतही चांगले योगदान देतो. त्याच्यासाठी या लिलावात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या दोन संघात चुरस होती. पण अखेर १०.७५ कोटींच्या बोलीसह दिल्लीने त्याला खरेदी केले. शार्दुलची या लिलावासाठी २ कोटी मुळ किंमत होती.
शार्दुल गेल्या ३ वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्स संघाचा महत्त्वाचा भाग होता. मात्र, यावर्षीच्या मेगा लिलावाआधी चेन्नईने त्याला मुक्त केले होते. त्यामुळे तो लिलावात उतरला होता. आता तो आयपीएल २०२२ मध्ये दिल्ली संघासाठी खेळताना दिसेल.
शार्दुलने आत्तापर्यंत ६१ आयपीएल सामने खेळले असून त्याने ६७ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL Auction | चेन्नईच्या प्रमुख गोलंदाजाला बंगळुरुने ओढले जाळ्यात, मोजले तब्बल ‘इतके’ कोटी
बाबोव! कॅप्टन रोहितपेक्षाही जास्त पैसे कमावत इशानची वाढली शान, बनला सर्वात महागडा मुंबईकर
IPL AUCTION: ‘या’ तीन सुंदर चेहऱ्यांची होतेय सर्वत्र चर्चा; जाणून घ्या कोण आहेत