इंडियन प्रीमीयर लीगच्या १५ व्या हंगामाचा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक चकीत करणारे निर्णय फ्रँचायझींनी घेतले. अनेक युवा खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागली, अनेक दिग्गज खेळाडूंमध्ये कोणीही पसंती दाखवली नसल्याचे दिसले. दरम्यान, या लिलावात सर्वांचेच लक्ष वेधले ते वैभव अरोराने.
हिमाचल प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा २४ वर्षीय वैभवला पंजाब किंग्स संघाने २ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. त्याच्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स देखील प्रयत्न करत होते, मात्र पंजाबने बाजी मारली आणि वैभवला आपल्या संघात सामील करुन घेतले आहे. विशेष म्हणजे वैभव अरोराची मुळ किंमत २० लाख रुपये होती. त्यामुळे त्याला त्याच्या मुळ किंमतीच्या १० पटीने अधिकची रक्कम मिळाली.
उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या वैभवला १२ टी२० सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याने १२ टी२० सामन्यांमध्ये १२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याला ८ प्रथम श्रेणी सामन्यांचा आणि ५ अ दर्जाच्या सामन्यांचाही अनुभव आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पंड्याची उणीव भरून काढण्यासाठी मुंबईने खेळला ‘या’ खेळाडूवर ८ कोटीचा दाव
IPL Auction: इंग्लडचा ‘हा’ गोलंदाज मुंबईच्या ताफ्यात दाखल; १.५० कोटींची लागली बोली
डेवन कॉन्वेचा चेन्नईमध्ये प्रवेश !! तब्बल इतक्या कोटींची लागली बोली