---Advertisement---

बांगलादेशमध्ये आयपीएलवर बंदी! मुस्तफिजुर रहमानला केकेआरमधून काढल्यानंतर घेतला मोठा निर्णय

On: सोमवार, जानेवारी 5, 2026 5:16 PM
---Advertisement---

बांगलादेश सरकारने एक धक्कादायक पाऊल उचलले आहे. त्यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) बांगलादेशातील प्रसारणावर बंदी घातली आहे. काही काळापूर्वी बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) मुस्तफिजुर रहमानला त्यांच्या संघातून बाहेर काढण्याचे निर्देश दिले होते. कोलकाता नाईट रायडर्सने बीसीसीआयचे म्हणणे मान्य करत रहमानला संघातून काढून टाकले. यानंतर वादाला तोंड फुटले आणि काळाप्रमाणे तो वाढतच गेला. आता आयपीएलचे सामने बांगलादेशातील चाहत्यांना कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पाहता येणार नाहीत.

बांगलादेशचे क्रीडामंत्री आसिफ नजरुल यांनी मुस्तफिजुर रहमानला केकेआरमधून रिलीज केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. बांगलादेशात आयपीएलचे प्रसारण बंद केले जाईल, असे त्यांनी सांगितले होते. आता बांगलादेश सरकारने तसा आदेश पास केला असून आयपीएलचे सामने तिथे लाईव्ह दिसणार नाहीत. बांगलादेश सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “मुस्तफिजुर रहमानला केकेआरने आयपीएल 2026 मधून बाहेर काढले. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अशा निर्णयाला कोणतेही सबळ कारण नाही. यामुळे बांगलादेशातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या परिस्थितीनंतर पुढील सूचनेपर्यंत आम्ही आयपीएलचे सर्व सामने आणि कार्यक्रमांचे प्रसारण बंद केले आहे. हा निर्णय प्राधिकरणाच्या मंजुरीने आणि जनहितासाठी घेण्यात आला आहे.”

मुस्तफिजुर रहमानला बाहेर काढण्याचा निर्णय बराच चर्चेत राहिला. बांगलादेश सरकारने केवळ आयपीएलवरच बंदी घातलेली नाही, तर आपला संघ भारतात पाठवण्यासही नकार दिला आहे. खरं तर, टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये बांगलादेशचे साखळी फेरीतील सामने कोलकाता आणि मुंबईत होणार होते.
बीसीबीने अधिकृत निवेदन जारी करून सांगितले की, ते भारतात येऊन सामने खेळणार नाहीत. त्यांनी सुरक्षेचे कारण पुढे केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयसीसीने बांगलादेशचे सामने श्रीलंकेत हलवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच नवीन वेळापत्रक समोर येऊ शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---