आयपीएल 2026 (IPL 2026) चा लिलाव अजून काही महिन्यांनी होणार आहे, पण खेळाडूंच्या ट्रेड विंडोमध्ये अनेक गोष्टी सुरु झाल्या आहेत. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Rajasthan royals captain Sanju Samson) ट्रेड होणार अशी चर्चा होत आहे. चेन्नई सुपर किंग्ससह (Chennai super kings) इतरही अनेक संघ सॅमसनला ट्रेडिंगद्वारे आपल्या संघात घेण्यासाठी इच्छुक आहेत.
ट्रेड विंडोची वेळ
क्रिकबझनुसार, IPL 2026 ची पहिली ट्रेड विंडो आयपीएल 2025 संपल्यानंतर एक आठवड्याने, म्हणजे 10 जून रोजी सकाळी 9 वाजता सुरू झाली आहे. ही विंडो आयपीएल 2026 च्या लिलावाच्या एक आठवडा आधी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील.
दुसरी ट्रेड विंडो लिलाव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुरू होईल आणि आयपीएल 2026 चा हंगाम सुरू होण्याच्या एक महिना आधीपर्यंत चालू राहील.
लिलावात खरेदी केलेले खेळाडू ट्रेड करता येत नाहीत.
विदेशी खेळाडूचे ट्रेडिंग त्याच्या क्रिकेट बोर्डकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळाल्यावरच करता येते.
ज्याचं ट्रेडिंग होत आहे किंवा ज्याच्यासाठी खेळतोय त्या खेळाडूला वेगळे पैसे दिले जात नाहीत.
ज्या फ्रँचायझीकडून खेळाडू घेतला जातो, त्यांची जबाबदारी असते की खेळाडू फिट आहे का हे तपासणे. तसेच सर्व कागदपत्रांवर सही करण्याआधी, त्या संघाला खेळाडूची वैद्यकीय तपासणी करण्याचा अधिकार असतो.
या दोन ट्रेड विंडोमध्ये किती खेळाडू ट्रेड होतील यावर मर्यादा नाही, पण पगार मर्यादा आणि संघाच्या रचनेच्या स्क्वॉड कॉम्बिनेशन नियमांचे पालन करणे बंधनकारक असते.
एका खेळाडूला आयपीएल 2025 संपल्यावर आणि आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी फक्त एकदाच ट्रेड करता येते.
म्हणजेच,15 कोटींचा एखादा खेळाडू जर ट्रेड केला जात असेल, तर तो घेणाऱ्या संघाच्या पॉकेटमधून 15 कोटी रुपये कमी होतील आणि तो खेळाडू सोडणाऱ्या संघाच्या पॉकेटमध्ये तेवढे पैसे वाढतील.
जर एखाद्या खेळाडूला अनेक संघ हवेत असतील, तर त्याला सोडणारी फ्रँचायझी इतर संघांशी चर्चा करू शकते. पण अंतिम निर्णय खेळाडूच्या संमतीनेच होतो.