यंदाचा आयपीएल हंगाम (IPL 2025) भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला होता. पण त्यानंतर आता आयपीएलचे उर्विरत सामने सुरू होण्याच्या बातम्या समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार आयपीएलचे उर्वरित सामने (16 मे) रोजी सुरू होऊन (30 मे) पर्यंत संपतील. पण आयपीएल 2025चा फायनल सामना कुठे खेळला जाणार? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या (PTI) रिपोर्टनुसार आयपीएल 2025चा फायनल नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे (30 मे) रोजी अॅक्यू वेदरनुसार कोलकाताच्या ईडन गार्डन्समधील हवामान खराब आहे. त्यादिवशी ढगाळ हवामान आणि पावसाचा अंदाज असल्यामुळे फायनल सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो. पण या फायनल सामन्याच्या ठिकाणाबद्दल अजूनही चर्चा सुरू आहे.
???? IPL FINAL COULD BE IN NARENDRA MODI STADIUM ????
— Johns. (@CricCrazyJohns) May 11, 2025
– The reason being inclement weather on May 30 as per Accu Weather in Eden Gardens. [Kushan Sarkar From PTI]
Cloudy weather & rainfall predicted on that day – it's still under discussion about the venue of the final. pic.twitter.com/VitMQd9eID
आयपीएल 2025 अपडेट्स..!
- बीसीसीआय आयपीएल 30 मे पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे.
- 16 मे पासून चेन्नई, बेंगलोर आणि हैदराबाद येथे सामने होण्याची शक्यता आहे.
- नवीन वेळापत्रक आज (11 मे) रात्रीपर्यंत फ्रँचायझींना जाहीर केले जाऊ शकते.




