इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामाचा अंतिम सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (२९ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. हा सामना गुजरात टायटन्सने संघाने जिंकत आयपीएलच्या १५ व्या हंगामाचे विजेतेपेद जिंकले. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने गोलंदाजीत ३ विकेट्स घेतल्या, तर फलंदाजीत ३४ धावा केल्या.
गुजरात समोर राजस्थानने १३१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग गुजरातने १८.१ षटकांत ३ विकेट्स गमावत पूर्ण केला आणि पहिल्याच आयपीएल हंगामात विजेतेपद आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे यापूर्वी असा विक्रम केवळ राजस्थान रॉयल्सने केला होता. राजस्थानने २००८ साली पहिल्याच आयपीएल हंगामात विजेतेपद जिंकले होते.
गुजरातकडून १३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिलने सर्वाधिक ४५ धावा केल्या. तसेच कर्णधार हार्दिक पंड्याने ३४ धावा केल्या. याशिवाय डेव्हिड मिलरने ३२ धावांची खेळी केली. या सामन्यात सुरुवातीला राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी गुजरातवर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण हार्दिक आणि शुबमन यांनी ६३ धावांची भागीदारी रचली आणि गुजरातला विजयाच्या दिशेने नेले.
विशेष गोष्ट अशी की, गिलला २ वेळा जीवदानही मिळाले. त्याचा पहिला झेल युजवेंद्र चहलने सोडला, तर दुसरा झेल शिमरॉन हेटमायरने सोडला. या जीवदानाचा फायदा घेत शुबमनने गुजरातला विजय मिळवून दिला. राजस्थानकडून गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हार्दिक पंड्याची शानदार गोलंदाजी
या सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १३० धावा केल्या आणि गुजरातसमोर १३१ धावांचे आव्हान ठेवले. गुजरात टायटन्सने पहिल्या डावात शानदार गोलंदाजी प्रदर्शन करत राजस्थानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय प्रथमत: चूकीचा ठरवला. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी सलामीला येत चांगली सुरुवात केली होती. पण, हे दोघे स्थिर झालेत असं वाटत असतानाच जयस्वाल १६ चेंडूत २२ धावा करून बाद झाला. त्यानंतरही कर्णधार संजू सॅमसनने बटलरला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण सॅमसनही हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर १४ धावा करून साई किशोरकडे झेल देऊन बाद झाला.
यानंतर मात्र राजस्थानने नियमित कालांतराने विकेट्स घालवल्या. बटलर देखील ३५ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला. त्यालाही हार्दिक पंड्याने बाद केले. शिमरॉन हेटमायरही ११ धावांवर बाद झाला. अन्य फलंदाजांनाही खास काही करता आले नाही. त्यामुळे राजस्थान संघ २० षटकांत ९ बाद १३० धावाच करू शकले.
गुजरातकडून कर्णधार हार्दिक पंड्याने शानदार गोलंदाजी करताना ४ षटकांत १७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याने बटलर, हेटमायर आणि सॅमसन या राजस्थानच्या मुख्य विकेट्स घेतल्या. हार्दिक व्यतिरिक्त आर साई किशोरने २ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खान यांनी प्रत्येक १ विकेट घेतली.
𝗜𝗻𝗻𝗶𝗻𝗴𝘀 𝗕𝗿𝗲𝗮𝗸!
Captain @hardikpandya7 leads the charge with the ball in the #TATAIPL 2022 Final as @gujarat_titans limit #RR to 130/9. 👏 👏
The #GT chase to begin shortly. 👍 👍 #GTvRR
Scorecard▶️ https://t.co/8QjB0b5UX7 pic.twitter.com/iB0To3zLbw
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
असे आहेत संघ
या सामन्यासाठी राजस्थान संघाने अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे क्वालिफायर दोन सामन्यात खेळलेला राजस्थान संघच अंतिम सामन्यातही खेळताना दिसणार आहे. तसेच गुजरात टायटन्सने अंतिम ११ जणांमध्ये एक बदल केला आहे. गुजरातने अल्झारी जोसेफ ऐवजी लॉकी फर्ग्यूसनला अंतिम ११ जणांमध्ये संधी दिली आहे.
🚨 Toss Update 🚨@IamSanjuSamson has won the toss & @rajasthanroyals have elected to bat against the @hardikpandya7-led @gujarat_titans in the summit clash.
Follow The Final ▶️ https://t.co/8QjB0b5UX7 #TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/AGlMfspRWd
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
असे आहेत ११ जणांचे संघ
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मॅकॉय, युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी क्रिकेटरच्या फक्त राजस्थानला शुभेच्छा, दिला खास संदेश
फायनलपूर्वी शेन वॉर्नच्या आठवणीने जोस बटलरला कोसळले रडू, Photo आणि Video होतोय व्हायरल