इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी हे सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी नुकतीच त्यांच्या नव्या नात्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, ज्यामुळे त्यांची चर्चा होत आहे. ललित मोदी हे सध्या बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन हिला हेट करत आहेत.
त्यांचे हे नाते जगासमोर आल्यानंतर क्रिकेटप्रेमींसह बॉलिवूडला फॉलो करणाऱ्यांनी या दोघांबद्दल, त्यांच्या लाईफस्टाईल, त्यांच्या संपत्तीबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. येथे आपण ललित मोदी (Lalit Modi) आणि सुष्मिता सेन (Sushmita Sen) यांच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊया…
Just back in london after a whirling global tour #maldives # sardinia with the families – not to mention my #betterhalf @sushmitasen47 – a new beginning a new life finally. Over the moon. 🥰😘😍😍🥰💕💞💖💘💓 pic.twitter.com/Vvks5afTfz
— Lalit Kumar Modi (@LalitKModi) July 14, 2022
सुष्मिता सेनची संपत्ती
बॉलिवूडचे नव्वदचे दशक गाजवणारी अभिनेत्री सुष्मिता सेन हिची संपत्ती (Sushmita Sen Net Worth) कोटीत आहे. अभिनय, जाहिराती आणि मॉडेलिंगद्वारे ती बक्कळ पैसा कमावते. माध्यमांतील वृत्तांनुसार, सुष्मिता सेन दर महिन्याला ६० लाख रुपये कमावते. तर तिची एकूण संपत्ती जवळपास ७४ कोटी आहे. चित्रपट आणि ब्रँड प्रमोशन हे सुष्मिता सेनच्या नेट वर्थ कमाईचे मुख्य साधन आहे. ती एका चित्रपटासाठी तीन ते चार कोटी रुपये घेते, तर ब्रँड प्रमोशनसाठी सुमारे १.५ कोटी रुपये घेते.
४६ वर्षीय सुष्मिता सेन मुंबईतील वर्सोवातील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहाते. तसेच तिला गाड्यांचीही खूप आवड आहे. तिच्याकडे बीएमडब्ल्यू सेव्हन सीरीज ७३० एलडी कार आहे. या कारची किंमत १.४२ कोटी रूपये आहे. तसेच बीएमडब्ल्यू एक्स सिक्स आणि ऑडी क्यू सेव्हनही आहे.
ललित मोदींची कमाईही आहे भरपूर
तर आयपीएलचे जनक ललित मोदी (Lalit Modi Net Worth) हे व्यावसायिक घराण्यातील आहेत. त्यांची संपत्ती सुष्मिता सेनपेक्षाही खूप जास्त आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ललित मोदी यांची एकूण कमाई ५७ कोटी डॉलर, भारतीय चलनांनुसार ४५५५ कोटी असल्याचे समजते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
नाचा रे! लेकींसोबत पुन्हा थिरकला वॉर्नर, वरुण धवनच्या ‘नाच पंजाबन’ गाण्यावरील डान्स व्हिडिओ व्हायरल