इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा सोळावा हंगाम (आयपीएल 2023) आता अर्ध्याकडे चालला आहे. स्पर्धा चुरशीची होत असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल यांनी हंगामातील प्ले ऑफ सामन्यांच्या ठिकाणांची घोषणा केली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 28 मे रोजी या हंगामाचा अंतिम सामना खेळला जाईल.
🚨 NEWS 🚨
BCCI Announces Schedule and Venue Details For #TATAIPL 2023 Playoffs And Final.
Details 🔽https://t.co/JBLIwpUZyf
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2023
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2023 च्या प्ले ऑफ्समधील पहिला क्वालिफायर व एलिमिनेटर सामना चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळले जातील. त्यानंतर दुसरा क्वालिफायर व अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील. अहमदाबाद सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्याचे यजमानपद भूषवेल.
बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीत हे निर्णय घेतले गेले. जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेचा अंतिम सामना होईल. तत्पूर्वी, चेन्नई येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 23 मे रोजी गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावरील संघात पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. या सामन्यात विजेता संघ थेट अंतिम फेरी प्रवेश करेल. 24 मे रोजी तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघ एलिमिनेटर सामन्यात भिडतील. या सामन्यातील पराभूत संघ स्पर्धेबाहेर होईल.
त्यानंतर अहमदाबादमध्ये 26 मे रोजी पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघ व एलिमिनेटरमधील विजेता संघ आमनेसामने येथील. या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम सामना खेळेल.
(IPL Governing Council Announced IPL 2023 Play Offs Venues Ahmedabad Narendra Modi Stadium Host Final Again)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो हिरा आहे, जो नेहमी जुन्या मित्रांना…’, भज्जीने तोंडभरून केलं रोहितचं कौतुक, तुम्हीही वाचाच
दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंच्या साहित्याचा लागला शोध, लाखोंच्या बॅट गेलेल्या चोरीला, दिल्ली पोलिसांनी 48 तासात लावला छडा