इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत आतापर्यंत 52 सामने खेळून झाले आहेत. यातील गुणतालिकेत अनुक्रमे टॉप 4 स्थान पटकावणाऱ्या संघांनी प्रत्येकी 11 सामने खेळले आहेत, तर उर्वरित 6 संघांनी प्रत्येकी 10 सामने खेळले आहेत. या सर्वांमध्ये अव्वलस्थानी गुजरात टायटन्स संघ 16 गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. तसेच, दुसऱ्या स्थानी 13 गुणांसह चेन्नई सुपर किंग्स आहे. तिसऱ्या स्थानी लखनऊ सुपर जायंट्स असून त्यांचे 11 गुण आहेत, तर चौथ्या स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाचे 10 गुण आहेत. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ 10 गुणांसह पाचव्या स्थानी आहे.
आरसीबी संघाला गोलंदाजी विभागाची चिंता
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या गुणतालिकेत 16 गुणांसह अव्वलस्थानी आहे. मात्र, इतर संघांना प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी खूपच मेहनत घेण्याची गरज आहे. त्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) या संघाचाही समावेश आहे. आरसीबी (RCB) संघ या हंगामात चांगली कामगिरी करत आहे. मात्र, गोलंदाजी विभाग हा संघाची सर्वात मोठी चिंता ठरत आहे. अनेक सामन्यात फलंदाजांनी चांगली कामगिरी करूनही गोलंदाजांमुळे संघाला सामना गमवावा लागला आहे.
आरसीबी संघ आयपीएल 2023च्या प्ले-ऑफमध्ये (IPL 2023 Play-offs) कसा जाणार?
‘ई साला कप नामदे’ची (Ee Sala Cup Namde) आस लावून बसलेल्या आरसीबी चाहत्यांसाठी हे जाणून घेणे गरजेचे आहे की, आरसीबी संघ कशाप्रकारे प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवू शकतो. फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याच्या नेतृत्वातील आरसीबी संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. आरसीबीने आतापर्यंत 10 सामने खेळले असून संघाला फक्त 5 सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे.
प्ले-ऑफपूर्वी आरसीबी संघाला 4 सामने खेळायचे आहेत. हे चारही सामने मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघांविरुद्ध होणार आहेत. विशेष म्हणजे, या चारपैकी 3 सामने त्यांना घरच्या मैदानावर म्हणजेच बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळायचे आहेत. या चारही सामन्यापैकी कोणत्याही परिस्थितीत आरसीबी संघाला तीन सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. कारण, तेव्हाच संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरू शकतो. दुसरीकडे, जर आरसीबीने चारही सामने जिंकले, तर ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचू शकतात. मात्र, दुसरे स्थान पटकावणे इतके सोपे नाहीये. कारण, गुजरात आणि चेन्नईसारखे संघ शानदार कामगिरी करत आहेत.
यावर्षी जर आरसीबीला आपल्या चाहत्यांची मने आणि आयपीएल ट्रॉपी जिंकायची असेल, तर त्यांना पुढील सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करावी लागणार आहे. आता संघ पुढील सामन्यात कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (ipl how can rcb qualify for playoffs in ipl 2023 know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा सामना लवकर विसरू…’, 4 विकेट्स घेऊनही हैदराबादविरुद्ध पराभव होताच चहलची सर्वात मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! पाकिस्तानच्या बाहेरच होणार Asia Cup 2023? श्रीलंका अन् बांगलादेशचा भारताला पाठिंबा