---Advertisement---

‘मिस्टर आयपीएल’च्या खणखणीत षटकाराने लुटली मैफील, मागे थांबलेला धोनी बघतच राहिला

On: शनिवार, सप्टेंबर 4, 2021 10:00 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव आणि स्पर्धेदरम्यान काही खेळाडूंना झालेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे हा हंगाम अर्ध्यातून स्थगित करण्यात आला होता. हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी  चेन्नई सुपर किंग्जसह इतरही सर्व संघ यूएईत दाखल झाले आहेत. संघांनी मैदानात सरावाला सुरूवात केली आहे. अशात चेन्नईचा फलंदाज सुरेश रैना याचा सरावादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

मैदानावर सराव करताना सुरेश रैनाने एक अप्रतिम षटकार मारला आहे. त्याने या षटकारासह चेंडूला मैदानाच्या छतावर मारले आहे. रैनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनी आणि अंबती रायडू त्याने मारलेल्या शाॅटनंतर चेंडूकडे थक्क होऊन पाहत आहेत.

त्याने स्वत: त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडला ‘राॅकस्टार’ चित्रपटातील ‘फिर से उड चला’ हे गाणे वाजत आहे. रैनाने व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “एक दम धुव्वादार”

चाहत्यांनी रैनाने खेळलेल्या शाॅटला पाहून त्याच्या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘आम्हांला हे आयपीएलमध्ये पाहायचे आहे.’

https://www.instagram.com/reel/CTVItrhhFl7/?utm_source=ig_web_button_share_sheet

रैना आयपीएलच्या मागच्या हंगामामध्ये त्याच्या वैयक्तिक करणास्तव स्पर्धेतून माघार घेतली होती. तो या हंगामात पुन्हा संघासोबत सहभागी झाला आहे. एमएस धोनीने या गोष्टीची पुष्टी केली होती की, चेन्नईसोबत रैनाचा तो शेवटचा सामना नव्हता. आयपीएलच्या मागच्या हंगामात चेन्नईचे प्रदर्शन खूपच खराब होतो. मात्र आयपीएलच्या चालू १४ व्या हंगामामध्ये संघाने चांगली कामगिरी केली आहे. संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. संघाने खेळलेल्या ७ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत.

तसेच आयपीएलच्या उर्वरित सामन्यासाठी यूएईत सर्वात आधी पोहेचणारा संघ चेन्नई सुपर किंग्ज आहे. यावरुन संघ पहिल्या टप्प्यातील लय कायम राखत युएईतील टप्प्यातही धमाल करण्यासाठी तयारी करत असल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषकामध्ये ‘या’ संघांच्या विजयाचं पारडं असेल जड, मातब्बर फिनिशर्सची आहे भरमार

इंग्लंडमध्ये रोहितच ‘हिट’! द्रविड, सचिनला मागे टाकलेच, पण ब्रॅडमन, रिचर्ड्स यांच्या मांदियाळीतही मिळवली जागा

‘पाकिस्तानविरुद्ध खेळताना माझे रक्त गरम व्हायचे’, सेहवागने सांगितल्या वनडे पदार्पणाच्या आठवणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---