आयपीएल 2020 शेवटच्या टप्प्यात अधिक मजेदार बनली आहे. मुंबईचा संघ ‘प्ले ऑफ’ मध्ये दाखल झाला असून शर्यतीत असलेले इतर 6 संघ देखील आता प्राण पणाला लावणार आहेत. पुढील 3 दिवसांत होणाऱ्या 4 सामन्यांवर 6 संघांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
आयपीएल स्पर्धा सुरू होण्याची प्रतीक्षा खेळाडू आणि चाहते दोघांनाही लागलेली असते. बहुप्रतीक्षेत असलेली ही स्पर्धा अखेर सुरू झाली आणि शेवटच्या टप्प्यातही पोहोचली. एखादा संघ ‘प्ले ऑफ’ साठी पात्र ठरण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी यावेळी 49 सामन्यांची प्रतीक्षा करावी लागली होती. आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा संघ ‘प्ले ऑफ’ मध्ये दाखल झाला आहे. त्याचप्रमाणे निराशाजनक कामगिरी केल्या नंतर चेन्नई सुपरकिंग्सचे आवाहन संपुष्टात आले आहे.
आता ‘प्ले ऑफ’ मधील तीन जागांसाठी उर्वरित सहा संघांमध्ये घनघोर युद्ध रंगणार आहे. अशात हे प्रत्येक संघ स्वतः बरोबरच इतर संघांच्या हार जीतवर अवलंबून असणार आहेत. आणि यासाठी उरलेत फक्त चार सामने जे पुढील तीन दिवसांत रंगणार आहेत. 56 पैकी 52 सामने संपले असून उरलेले 4 सामने 6 संघांपैकी 3 संघ ‘प्ले ऑफ’चे दरवाजे उघडणार आहेत.
सामना 53 : पंजाब साठी ‘करा अथवा मरा’
किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यांत एकमेकांसमोर असणार आहेत. चेन्नईचे आव्हान संपुष्टात आल्याने त्यांच्या साठी हा सामना फक्त जिंकून चांगला शेवट करणे हे एकच उद्दिष्ट असणार आहे. पण त्यांचे हे उद्दिष्ट पंजाबला देखील बाहेर घेऊन जाऊ शकते. जर पंजाबने हा सामना गमावला तर त्यांनाही चेन्नई बरोबर बाहेर पडावे लागेल. रन रेटच्या आधारावर ‘प्ले ऑफ’ मध्ये जागा बनवणे पंजाबसाठी कठीणच असणार आहे. त्यामुळे त्यांना हा सामना जिंकनेच आहे.
सामना 54 : कोलकाता वि. राजस्थान – काट्याची टक्कर
कोलकाता आणि राजस्थानमध्ये होणारा हा सामना काट्याची टक्कर असणार आहे. प्रत्येकाचा शेवटचा सामना ‘प्ले ऑफ’ चं तिकीट ठरवणार आहे. हे दोन्ही संघ विजया नव्हे तर ‘प्ले ऑफ’ ज्या जागेसाठी लढणार आहेत. विजयी संघाला थेट ‘प्ले ऑफ’ मध्ये जागा तर पराभूत संघाला बाहेरचा रस्ता धरावा लागणार आहे.
सामना 55 : दिल्ली वि. बेंगलोर – लढाई ‘टॉप 2’ साठीची
दिल्ली आणि बेंगलोरच्या संघाने या हंगामात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये झालेल्या लढतीत विजयी संघ दुसऱ्या स्थानी जाऊन मुंबई विरोधात ‘प्ले ऑफ’ चा पहिला सामना खेळेल. तर पराभूत झालेला संघ रन रेटच्या आधारावर ‘प्ले ऑफ’ मध्ये राहण्यासाठी दुसऱ्या संघाच्या हार जीत अवलंबून राहील.
सामना 56 :- अंतिम सामना
हा सामना स्पर्धेतील अंतिम सामना असणार आहे. या सामन्या नंतर ‘प्ले ऑफ’ चा थरार सुरू होणार आहे. मुंबई विरुद्ध हैद्राबाद असा हा सामना असणार आहे. या सामन्यात हैद्राबादच्या संघाने मुंबईला मोठ्या फरकाने हरवणे गरजेचे असणार आहे. या विजयासह हैद्राबादचे 14 गुण होणार असून इतर संघांच्या गुणांच्या तुलनेत रन रेटच्या जोरावर हैद्राबादला जागा बनवावी लागणार आहे. मुंबई सारख्या बलाढ्य संघाला मोठ्या फरकाने हरवणे हैद्राबादसाठी फार मोठे आव्हान असणार आहे. तर मुंबईसाठी हा सामना एक साधारण सामना असणार आहे. परंतु मुंबईचा विजय शर्यतीत राहिलेल्या इतर संघांसाठी दिलासा देणारा असणार आहे. ‘टॉप 2’ मध्ये जागा बनल्याने मुंबई हा सामना अगदी आरामदायकपणे खेळण्याची शक्यता आहे. या सामन्यात मुंबई बाहेर बसलेल्या खेळाडूंना संधी देण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.