---Advertisement---

IPL मध्ये केवळ प्लेऑफ नाही, तर ‘टॉप-2’ मध्ये येण्यासाठी का असते चुरस? जाणून घ्या मिळणारे मोठे फायदे

On: मंगळवार, मे 19, 2026 8:19 PM
---Advertisement---

आयपीएल (IPL 2026) मध्ये आतापर्यंत 3 संघांनी (RCB, GT, SRH) प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे, तर शेवटच्या एका जागेसाठी अजूनही चुरस सुरू आहे. आयपीएलमध्ये प्रत्येक संघाचे पहिले ध्येय हे प्लेऑफ म्हणजेच ‘टॉप-4’ मध्ये पोहोचणे हेच असते. पण एकदा का तिथे जागा मिळाली, की लीग सामने संपेपर्यंत प्रत्येक संघाचा प्रयत्न ‘टॉप-2’ मध्ये राहण्याचा असतो. याचे कारण म्हणजे पहिल्या दोन क्रमांकावर राहणाऱ्या संघांना मिळणारे मोठे फायदे. याच फायद्यांमुळे प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतरही संघ अव्वल दोन स्थानांवर हंगाम संपवण्यासाठी पूर्ण ताकद लावतात. चालू हंगामात 3 संघ प्लेऑफमध्ये पोहोचले असले, तरी अजून कोणाचेही ‘टॉप-2’ मधील स्थान निश्चित झालेले नाही.

आयपीएलच्या प्रत्येक हंगामात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर राहणाऱ्या संघांना विशेष सवलती मिळतात. ते म्हणजे फायनलमध्ये जाण्याची दुहेरी संधी मिळते तसेच, टॉप-2 मधील संघांना थेट फायनलचे तिकीट मिळवण्याची पहिली संधी मिळते. हे दोन संघ ‘क्वालिफायर-1′ चा सामना खेळतात. यात जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये पोहोचतो. क्वालिफायर-1’ मध्ये हरणारा संघ स्पर्धेतून बाहेर होत नाही, तर त्याला फायनलमध्ये जाण्याची आणखी एक संधी मिळते. या हरलेल्या संघाला ‘क्वालिफायर-2’ मध्ये खेळावे लागते. तिथे त्यांचा सामना ‘एलिमिनेटर’ सामना जिंकून आलेल्या संघाशी होतो. म्हणजेच एलिमिनेटर सामना पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या संघांमध्ये होतो. या सामन्यात हरणारा संघ थेट बाहेर पडतो. या नियमांमुळे, क्वालिफायर-1 जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये जातो आणि हरणारा संघ क्वालिफायर-2 जिंकून पुन्हा फायनल गाठू शकतो. म्हणजेच ‘टॉप-2’ मधील दोन्ही संघ फायनलमध्ये समोरासमोर येण्याची शक्यता असते.

टॉप-2 मध्ये राहण्याचा आणखी एक फायदा असा असतो की, क्वालिफायर-1 जिंकणाऱ्या संघाला फायनलच्या तयारीसाठी जास्त वेळ मिळतो. आधीच्या नियमांनुसार, क्वालिफायर-1 मध्ये हरणारा संघ त्याच मैदानावर क्वालिफायर-2 खेळायचा जिथे फायनल होणार असते. मात्र, यावेळी हा नियम बदलण्यात आला आहे. आयपीएल 2026 च्या नॉकआउट सामन्यांच्या वेळापत्रकात (Schedule) बदल करण्यात आले आहेत. क्वालिफायर 1 सामना 26 मे रोजी धर्मशाळा येथे खेळवला जाईल. तर क्वालिफायर-1 मधील पराभूत संघाला क्वालिफायर-2 खेळण्यासाठी मुल्लानपूर येथे जावे लागेल. हा सामना 29 मे रोजी होईल. यानंतर 31 मे रोजी अहमदाबाद येथे महामुकाबला (फायनल) खेळवला जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---