भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मीडीया हक्कांसाठी ३२८९० हजार कोटी रुपये मुळ किंमत ठरवली आहे. यामध्ये ४ बंडलचा समावेश आहे. यामध्ये उपमहाद्वीपाचे टीव्ही राइट्स, भारतीय उपमहाद्वीपाचे डिजीटल राइट्स, नाॅन एक्सक्लुझिव बंडल, जागतीक टीव्ही आणि डिजीटल राइट्स यांचा समावेश आहे.
बीसीसीआय येणाऱ्या काळात सामन्यांची संख्या वाढवणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी बीसीसीआयने ३० मार्चपासून इन्व्हिटेशन टू टेंडर डॉक्युमेंट जारी करण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये १० संघ आणि ७४ सामने यांच्यानुसार किंमत ठेवण्यात आली आहे. यावेळी मीडिया हक्कांमध्ये कोणतीही मिळती जुळती बोली लागणार नाही.
ए श्रेणीमध्ये भारतीय महाद्विपाचे टीव्ही राईट्स असणार आहेत. या श्रेणीतील सामन्याची मूळ किंमत ४९ कोटी आहे. अशा परिस्थितीत पाच वर्षांचा विचार केला तर ई-लिलावात मूळ किंमत १८१३० कोटी रुपये असेल. बी श्रेणीमध्ये डिजिटल राईट्स असणार आहेत आणि पाच वर्षांसाठी १२२१० कोटी रुपयांपासून पाच वर्षांसाठी ३३ कोटी रुपये प्रति सामना या मूळ किमतीने सुरु होईल.
बंडल सी इतरांपेक्षा वेगळा असणार आहे. यामध्ये केवळ १८ सामने होणार असून ते विशेष नसतील. यामध्ये एका सामन्याची मूळ किंमत १६ कोटी रुपये असणार आहे. त्यानुसार पाच वर्षांची मुळ किंमत १४४० कोटी रुपये आहे. या बंडलच्या १८ सामन्यांमध्ये सुरुवातीचे सामने, प्ले-ऑफ आणि डबल हेडर रात्रीचे सामने असतील.
हे बंडल फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी आहे आणि फक्त एक कंपनी ते खरेदी करू शकते. चौथ्या आणि शेवटच्या बंडलमध्ये उर्वरित जगाचे हक्क समाविष्ट आहेत. येथे एका सामन्याची मुळ किंमत ३ कोटी रुपये आहे. पाच वर्षांचे मूल्य १११० कोटी रूपये होते.
बीसीसीआयला आयपीएलच्या मीडिया राईट्समधून ५०,००० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. गुजरात आणि लखनऊ फ्रँचायझींच्या समावेशासह आयपीएल सामन्यांची संख्या ६० वरून ७४ झाली आहे. यामुळे लिलावात जोरदार बोलीची मोठी प्रतिस्पर्धा होण्याची शक्यता आहे कारण या विभागात आता जी सोनी आणि रिलाअन्स वयकॉम १८ देखील समाविष्ट आहेत. डिजिटल स्पेससाठी अॅमेझॉन प्राइम, मेटा आणि यूट्यूब आक्रमक बोली लावतील अशी बीसीसीआयची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
उमेश-चक्रवर्तीने वाचवली केकेआरची लाज! दहाव्या विकेटसाठी भागीदारी करताना केला आयपीएल रेकॉर्ड
‘मॅन इन फॉर्म’ पर्पल पटेलचा नवा आयपीएल रेकॉर्ड! केकेआरचे कंबरडे मोडत केली करामत