---Advertisement---

सीएसके संघ आयपीएल मेगा लिलावात सर्वात आधी खरेदी करणार ‘हा’ खेळाडू?

---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्सने (सीएसके) आयपीएल २०२२ मेगा लिलावाआधी आपल्या संघात ४ खेळाडू रिटेन केले आहेत. संघाने या ४ खेळाडूंमध्ये पहिल्या हंगामापासून संघात असलेला खेळाडू सुरेश रैनाला रिटेन केलं नाही. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे. याबद्दल मागच्या हंगामात सीएसकेकडून खेळलेला रॉबिन उथप्पा याने एक प्रतिक्रिया दिली.

उथप्पाने स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना हे सांगितले की, रैना संघाचा महत्त्वपूर्ण भाग आहे आणि संघ त्याला नक्कीच लिलावातून परत खरेदी करेल. फाफ डू प्लेसिससारख्या खेळाडूला सोडण्याचा कठोर निर्णय संघाला घ्यावा लागला. मोईन अलीला त्याच्या अष्टपैलू शैलीमुळे संघात ठेवण्यात आलं आहे.

उथप्पा हे देखील म्हणाला की, रैना सीएसके संघातला एक दिग्गज खेळाडू आहे. त्याने मागील १०-१२ वर्षात संघाला प्लेऑफमध्ये पोहचवायला नेहमीच योगदान दिले आहे.

आयपीएल मेगा लिलाव पुढीलवर्षी जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीएसके संघाकडे कोण कोणते खेळाडू घ्यायचे याचा विचार करण्यासाठी भरपूर वेळ आहे. रैना सुरुवातीपासून संघाचा भाग आहे, त्यामुळे त्याला परत संघात घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल.

सीएसके संघाने ४ खेळाडू रिटेन करताना रवींद्र जडेजाला १६ करोड दिले. तसेच कर्णधार एम.एस. धोनीला १२ करोड, मोईन अलीला ८ करोड आणि ऋतुराज गायकवाडला ६ करोड दिले. गतविजेता सीएसके संघ ह्यावर्षी देखील उत्कृष्ट संघ बनवण्याचा प्रयत्न करेल.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलमधील ३ दिग्गज ज्यांच्यावर आता बोली लागणं कठीण, कारकीर्द जवळपास संपुष्टात

आर्चर, स्टोक्स राजस्थान रॉयल्समधून मुक्त! संगकाराकडून निर्णायामागचे खरे कारण उघड

‘चॅप्टर क्लोज!’ सनरायझर्स हैदराबादमधून बाहेर पडल्यानंतर डेविड वॉर्नर झाला व्यक्त, चाहत्यांचेही मानले आभार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---