इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या 63व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात मुंबईने नाणेफेक गमावत लखनऊला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 3 विकेट्स गमावत 177 धावा केल्या. लखनऊच्या डावादरम्यान रोहित शर्मा याच्या संघाबाबत धक्कादायक बातमी समोर येत आहे. खरं तर, संघाचा नवीन पोलार्ड मानला जात असलेला टीम डेविड क्षेत्ररक्षण करताना वाईटरीत्या दुखापतग्रस्त झाला.
टीम डेविड दुखापतग्रस्त
झाले असे की, लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाच्या डावातील 20व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) याने लाँग ऑनच्या दिशेने मारला. यावेळी तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या टीम डेविड (Tim David) याने षटकारासाठी जाणारा चेंडू हवेत झेप घेत रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, डेविड षटकार रोखण्यात अपयशी ठरला. तसेच, स्वत:ला दुखापतग्रस्त करून घेतले. हवेत उडी मारल्यानंतर जेव्हा डेविड खाली पडला, तेव्हा त्याचे डोके जमिनीवर जोरात आपटले. यावेळी डेविड वेदनेने विव्हळत बराच वेळ जमिनीवर पडून राहिल्याचे दिसला.
https://twitter.com/barotharshal21/status/1658502754791481344?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1658502754791481344%7Ctwgr%5E5fdb119705c61621c388d6d4cddc0c3c94cb8ee0%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.jagran.com%2Fcricket%2Fipl-mumbai-indians-batsman-tim-david-got-injured-while-fielding-in-lsg-vs-mi-match-ipl2023-23414396.html
मुंबईचा नवीन फिनिशर म्हणून मिळवली ओळख
टीम डेविड याने मुंबई इंडियन्स संघासाठी आयपीएल 2023 स्पर्धेत नवीन फिनिशर म्हणून ओळख मिळवली आहे. तो या हंगामातील अनेक सामन्यांमध्ये एकट्याच्या जोरावर संघाला विजय मिळवून देऊ शकतो. राजस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात डेविडने सलग 3 चेंडूंवर षटकार मारत संघाला शानदार विजय मिळवून दिला होता. या हंगामात त्याने खेळलेल्या 12 सामन्यात 165च्या स्ट्राईक रेटने 184 धावा केल्या आहेत.
अखेरच्या षटकात स्टॉयनिसची धमाल
मार्कस स्टॉयनिसने अखेरच्या षटकात जबरदस्त फलंदाजी केली. त्याने वादळी अंदाजात फलंदाजी करताना ख्रिस जॉर्डन याच्या षटकात 24 धावा कुटल्या. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर लखनऊने अखेरच्या 3 षटकात 54 धावा केल्या. स्टॉयनिसने 47 चेंडूत नाबाद 89 धावा केल्या. तसेच, यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 8 षटकारही मारले.
विशेष म्हणजे, मुंबईच्या डावादरम्यान सूर्यकुमार यादव 7 धावांवर बाद होताच टीम डेविड फलंदाजीला आला. 16.1 षटकाच्या खेळादरम्यान त्याने 4 चेंडूत 7 धावा केल्या. यामध्ये 1 चौकाराचाही समावेश होता. (ipl mumbai indians batsman tim david got injured while fielding in lsg vs mi match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘टी20 संघातून होणार विराट-रोहित अन् राहुलची हाकालपट्टी’, भारताच्या माजी दिग्गजाचा खळबळजनक दावा
शेवटच्या तीन षटकांमध्ये लखनऊची धावसंख्या अचानकच उंचावली! 18व्या षटकात स्टॉयनिसने आणले वादळ