सीएसकेसाठी गुड न्यूज
गेला आठवडाभर संकटात सापडलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी एक चांगली बातमी आली आहे. आयपीएल स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यातच आता सीएसकेच्या सर्व सदस्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. गेल्या आठवड्यात दोन खेळाडूंसह सीएसकेचे तब्बल १३ सदस्य कोरोना बाधीत झाले होते. त्यामुळे संघाच्या आयपीएल खेळण्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले जात होते. अशा संकटाच्या वेळी मिस्टर आयपीएल सुरेश रैना व दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने स्पर्धेतून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली होती.
लसिथ मलिंगा नसल्याने मुंबईचे वाढले टेन्शन
सर्वाधिक वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी ही आयपीएल नक्कीच सोप्पी राहिलेली नाही. सामना एकहाती फिरवून देणारा त्यांच्या स्टार गोलंदाज लसिथ मलिंगा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. वैयक्तिक कारणामुळे त्याने ही माघार घेतली आहे. त्याच्या जागी संघात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचा समावेश करण्यात आला आहे. मलिंगा यापुर्वी २००८, २०१६ व २०१८ अशा तीन हंगामात खेळताना दिसला नाही. या तीनही हंगामात मुंबई संघ पाचव्या क्रमांकावर राहिला होता. आता हाच इतिहास मोडण्याची संधी रोहीत शर्माच्या मुंबईला आहे तर दुसऱ्या बाजूला मलिंगा नसण्याचे टेन्शनही संघाला असणार आहे.
मुस्तिफिजुर रहमानला आयपीएल खेळण्यासाठी नाही मिळाली एनओसी
आयपीएल जशी जशी जवळ येत चालली आहे तशी तशी अनेक खेळाडूंची यातून एक्झिट होत आहे. काही वैयक्तिक कारणामुळे तर काही आपल्याच देशाच्या बोर्डाने घेतलेल्या निर्णायामुळे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तिफिजुर रहमानच्या बाबतीतही असेच काही घडले. त्याला आयपीएल लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. परंतू आता एक एक करत परदेशी खेळाडू बाहेर जायला लागल्यामुळे त्याला दोन संघ आपल्या ताफ्यात घेण्यास उत्सुक आहे. एक म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स तर दुसरा मुंबई इंडियन्स. परंतू त्याला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने यासाठी एनओसी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो आयपीएलचा भाग होणार नाही.
एमएस धोनीने दुबईत पहिल्यांदाच केला सराव
नुकतंच आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या एमएस धोनीने काल दुबईत सराव केला. सीएसकेचा कर्णधार असलेल्या धोनीची टीम शुक्रवारी पहिल्यांदाच रात्री सराव करताना दिसली. यावेळी सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या धोनीने यावेळी रविंद्र जडेजा व पियुष चावल्याच्या फिरकी गोलंदाजीचा सामना केला. सीएसकेच्या या सराव सत्रात यापुर्वी कोरोना बाधीत झालेल्या रुतूराज गायकवाड व दिपक चाहरने भाग घेतला नाही. त्यांना १४ दिवसांचे क्वारंटाईन पुर्ण करावे लागणार आहे.
तुषार देशपांडेसारखा तगडा गोलंदाज दिल्लीच्या ताफ्यात
दिल्ली डेअरडेविल्स संघात यावेळी तगडा गोलंदाज खेळताना दिसणार आहे. मुंबईकर तुषार देशपांडे यावेळीचा आयपीएल हंगाम गाजविण्यासाठी सज्ज झाला आहे. २५ वर्षीय तुषार देशपांडे हा मुंबई रणजी संघाचा अविभाज्य भाग आहे. त्याने रणजी स्पर्धेत २० सामन्यात ५० बळी घेतले असून टी२० प्रकारात २० सामन्यात ३१ बळींची कामगिरी केली आहे. दिल्ली यावेळी एक तगडा संघ समजला जातो. मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार समजले जात आहे. आता याच मुंबईकर कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली तुषार कशी कामगिरी करतो हे पहाणे मनोरंजक ठरणार आहे.
क्रिकेट जगतातील अशाच ताज्या घडामोंडीसाठी महा स्पोर्ट्सला भेट द्या. वेबसाईटचा पत्ता आहे www.mahasports.in. तसेच महा स्पोर्ट्सला फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम व युट्युबला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरु नका.