लखनऊ सुपर जायंट्स संघाला रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिल्स संघाने शुक्रवारी (दि. 12) पराभवाचे पाणी चाखायला लावले. लखनऊच्या 168 धावांच्या आव्हानाचा यशस्वीरित्या पाठलाग करत दिल्लीने हंगामातील दुसरा विजय मिळवला. दिल्लीने हा विजय लखनऊ संघावर मिळवला असला तरीही यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला मोठा धक्का बसला आहे. ( IPL Points Table 2024 Updates After Delhi Capitals Beats Lucknow Super Giants )
शुक्रवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर दिल्ली कॅपिटल्सने 6 विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीचा हा यंदाच्या हंगामातला दुसरा विजय आहे. दिल्लीच्या या विजयामुळे आयपीएलच्या गुणतालिकेत मोठे बदल झाले आहेत. स्वतः दिल्ली कॅपिटल्स संघ 10 व्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आणि दिल्लीच्या विजयाचा दणका आरसीबीला बसला आहे. 6 पैकी 5 सामने गमावलेला आरसीबीचा संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी म्हणजे थेट 10 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
सामना गमावल्यानंतरही लखनऊ सुपर जायंट्स टॉप 4 मध्ये आहे. फक्त पराभवामुळे लखनऊ सुपर जायंट्स तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. चेन्नई आणि लखनऊ यांचे प्रत्येकी 6 गुण आहेत. पण धावगतीच्या जोरावर चेन्नईने बाजी मारली असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय टॉप 4 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि नाइट रायडर्स हे दोन संघ आहेत. राजस्थानने 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत, तर कोलकाता नाइट राडयडर्सने 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे.
पाचव्या क्रमांकावर सनरायजर्स हैदराबाद असून त्यांनी 5 सामन्यात 3 विजय मिळवले आहेत. सहाव्या क्रमांकावर गुजरात टायटन्स असून त्यांनी 6 पैकी 3 सामन्यात विजय मिळवता आला आहे. मुंबई इंडियन्स संघ 5 पैकी 2 सामने जिंकून सातव्या क्रमांकावर आहे.
अधिक वाचा –
– रोहित-विराटमध्ये टी20 विश्वचषकाबाबत चर्चा? मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममधील भेट चर्चेत
– हार्दिक पांड्याविषयी ‘हे’ काय बोलला ईशान किशन! जाणून घ्या एका क्लिकवर
– निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माची गुगली! टीम इंडियातील भवितव्याबद्दल म्हणाला…