---Advertisement---

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची चिंता मिटली; संघांना मिळाले प्रायोजक

On: शुक्रवार, ऑगस्ट 28, 2020 11:12 AM
---Advertisement---

मुंबई । राजस्थान रॉयल्सने 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार्‍या इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी टप्प्यासाठी टीव्ही -9 भारतवर्षला त्याचा प्रमुख भागीदार म्हणून नियुक्त केले. त्यामुळे एक्सपो 2020 दुबईऐवजी आता टीव्ही-9 चॅनेलचे नाव राजस्थान रॉयल्सच्या जर्सीवर दिसेल. दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ‘मॅक्स लाइफ इन्शुरन्स’ या कंपनीने प्रायोजकत्व दिले आहे.

यापूर्वी कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये टीव्ही 9 न्यूज नेटवर्कने ट्रिनबागो नाइट रायडर्सशी देखील करार केला होता. पुढील महिन्यात आयपीएल सुरू होणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळली जाईल. कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा भारताऐवजी युएईमध्ये आयोजित केली जात आहे.  आठही फ्रँचायझींचे खेळाडू आणि अधिकारी स्पर्धेच्या तयारीसाठी युएईमध्ये दाखल झाले आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यासह या स्पर्धेची सुरुवात होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघ या लीगमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहेत.  मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे, तर चेन्नई सुपर किंग्जने  कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वात तीन वेळा जेतेपद जिंकले आहे. गेल्या वर्षी आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले होते.

पण असे असले तरी अजून आयपीएलच्या या 13 व्या मोसमाचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---