एमएस धोनी… इंडियन क्रिकेटमधील आजवरचा सर्वात यशस्वी कॅप्टन. धोनीची लाईफ स्टोरी जवळपास सगळ्यांनाच माहितीये. आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून क्रिकेट पहिलं प्रेम असतानाही धोनीने नाखुषीने रेल्वे जॉब करायचा निर्णय घेतलेला. धोनी रेल्वेत तिकीट कलेक्टर बनलेला. पुढे तो चांगलं खेळला, टीम इंडियात आला, सक्सेसफुल झाला अशीही स्टोरी, पण आणखी एका इंडियन क्रिकेटरची स्टोरी अशीच रेल्वेपासून सुरु होते. त्याचं नाव कर्ण शर्मा.
उत्तर प्रदेशात सगळ्यात जास्त क्रिकेट कुठे खेळल जात असेल तर ते मेरठमध्ये. खरंतर मेरठमधून स्विंग बॉलर येतात. उदाहरण द्यायचं झालं तर प्रविणकुमार भुवनेश्वर कुमार. तसाच तिथे एक नवा क्रिकेटर उदयाला येत होता. लेग स्पिन करणारा आणि लंबे लंबे सिक्स मारणारा कर्ण शर्मा, पण घरची परिस्थिती बेताची होती. वय १७-१८ झालं की घरच्यांनी काम धंदा बघ क्रिकेट बंद कर असं म्हणायला सुरुवात केली, तेव्हाच त्याला कुणीतरी रेल्वेसाठी ट्रायल्स दे म्हणून सांगितले. ट्रायल्स दिल्या अन् २००५ मध्ये १८ व्या वर्षीच तो सिलेक्ट झाला.
धोनी टिकीट कलेक्टर झाला पण कर्णला फोर्थ ग्रेडच काम मिळालं गॅंगमनच. गॅंगमन म्हणजे काय तर रेल्वेची पटरी दुरुस्त करायला आणि लोखंडी रॉड व्हायला असतात ते कामगार, पण रेल्वेच्या क्रिकेट संघात असल्यामुळे त्याला थोडी सूट होती. त्याला कधीतरीच काम करायला लागायचे बाकी वेळ फक्त ग्राउंडवर. आता गोष्टी त्याच्या बाजूने घडू लागलेल्या. घरच्यांना मदतही होत होती आणि क्रिकेटही खेळायला मिळत होते.
हेही पाहा- 17 हजाराची नोकरी करणारा कर्ण एका दिवसात करोडपती झाला
कर्णने स्पेशालिस्ट बॅटर म्हणून रणजी डेब्यूला शतक मारलेले. तो थोडासा चर्चेत यायला लागलेला. आता आयपीएलमध्ये जसे लिलाव होतात तसे पहिल्या तीन सीजनला काही प्लेयर डायरेक्ट शोधून टीममध्ये घेतले जायचे. दुसऱ्या सिझनला कर्ण तसाच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये आला, पण खेळायची संधी काही मिळाली नाही. २०१३ ला नवीनच आलेल्या सनरायझर्स हैदराबादने त्याच्यावर डाव खेळला. त्याला बोली काही इतकी मोठी लागली नाही, पण डेल स्टेन अमित मिश्रा यांच्या जोडीने तो बॉलिंग करणार होता. जितक्या मॅचला चान्स भेटला तितक्या मॅचला कर्ण चमकला.
पुढच्या वर्षी मोठ ऑक्शन व्हायचं होतं. बऱ्याच टीमला लेगस्पिनरची गरज होती. कर्णच नाव आलं आणि ऑक्शन टेबलवर खळबळ उडाली. पंजाब मजबूत टीम बांधत होती आणि एक लेगस्पिनर कमी पडत होता. त्यांनी त्याचा पिच्छा पुरवला. इकडे कर्णन मागच्या वर्षी दाखवलेला परफॉर्मन्स सनरायझर्स विसरली नाही आणि त्याच्यासाठी ऑल आउट जायचा निर्णय घेतला. शेवटी ३ कोटी ७५ लाखांवर कर्णला सनरायझर्सन जिंकलं.
याच ऑक्शनवेळचा एक मजेदार किस्सा सांगितला जातो. कर्ण करोडपती बनला ही बातमी त्याला त्याच्या पत्नीने फोन करून सांगितली. त्याला यावर विश्वासच बसेना. त्याने आपला रेल्वेचा टीममेट अमित मिश्राला विचारले आणि दोघांनी इंटरनेटवर सर्च मारला आणि या बातमीचे कन्फर्मेशन केले. १७ हजार पगार असणारा कर्ण करोडपती बनला. त्या दिवसापासून कर्णच्या करियरच्या गाडीने स्पीड पकडला. सनरायझर्सच्या मेन स्पिनरची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली.
खरं तर २०१४ हे वर्षच त्याच्यासाठी लकी ठरलं. टीम इंडियाकडून त्यांना त्या वर्षी इंटरनॅशनल डेब्यू केला तोही तिन्ही फॉरमॅटमध्ये, पण जस वर्ष सरलं तसे त्याचे दिवस फिरले. एक टेस्ट, एक टी२० आणि एक वनडे इतकंच त्याचं इंटरनॅशनल करिअर राहीलं.
डॅनियल ख्रिस्टीयनला जसं टी२० क्रिकेटचा लकी चार्म म्हटलं जातं तसं कर्णला आयपीएलचा लकी चार्म म्हणायला हरकत नाही. २०१६ला तो सनरायझर्सच्या संघात होता सनरायझर्स आयपीएल जिंकली. पुढच्या वर्षी मुंबईकडे गेला मुंबई जिंकली. त्याच्या पुढच्या वर्षी चेन्नईसाठी खेळला चेन्नईने आयपीएल मारली. २०२१ ला पुन्हा चेन्नईच चॅम्पियन. त्याचा पायगुण पाहून आरसीबीने त्याला आपल्याकडे ओढलेलं, ई साल कप नमदे’ करायला. मात्र, यावेळी त्याचं लक आरसीबीला मिळालं नाही. आरसीबी दुसऱ्या क्वालिफायरपर्यंतच मजल मारू शकली.
कर्ण शर्मा हे नाव इंडियन डोमेस्टिक क्रिकेटमध्ये, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अन् आयपीएलमध्येही ग्रेट म्हणून कधीच घेतले जाणार नाही. पण तीन वेगवेगळ्या टीमकडून सलग तीन आयपीएल ट्रॉफी उंचावणाराही त्याच्यानंतर कोणी होणार नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडने ३ रनांनी मॅच मारली, आणि ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ ऐतिहासिक पराभवामुळे हसी क्रिकेटर झाला
आयपीएलला मोठी करणारे पाच श्रीलंकन लिजेंड, यांच्याबद्दल जाणून घेतलंच पाहिजे
धोनीने धावांचा पाऊस पाडणाऱ्या हेडनला ‘ती’ बॅट वापरण्यास केलेला विरोध, काय होती त्या बॅटची खासियत?