आयपीएलमध्ये भारतीय प्रशिक्षकांसाठी संधीचा आभाव असल्याबद्दल भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि सध्याचा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख राहुल द्रविडने निराशा व्यक्त केली आहे. तसेच त्याने म्हटले आहे की भारतीय प्रशिक्षकांना सपोर्ट स्टाफमध्ये न घेऊन संघ चूक करीत आहेत.
19 वर्षांखालील भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील वनडे सामने पाहण्यासाठी लखनऊला आलेला द्रविड म्हणाला, ‘मला असे वाटते की बरेच आयपीएल संघ सहाय्यक प्रशिक्षक म्हणून भारतीय प्रशिक्षकाच्या प्रतिभेचा उपयोग करण्याची युक्ती वापरत नाहीत. हे माझे वैयक्तिक मत आहे.’
‘प्रामाणिकपणे, आयपीएलमध्ये बरेच भारतीय खेळाडू आहेत. तसेच आपल्या प्रशिक्षकांकडे बरेच स्थानिक खेळाबद्दलचे ज्ञान आहे. मला वाटते की आयपीएलमध्ये भारतीय प्रशिक्षकांची मदत घेतली तर बर्याच संघांना खरोखरच फायदा होऊ शकेल,’ असे इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार राहुल द्रविड म्हणाला.
‘भारतीय प्रशिक्षक भारतीय खेळाडूंना चांगले ओळखतात, त्यांना चांगले समजतात. सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही त्यांच्याकडे बरेच कौशल्य आणि क्षमता आहे. त्यांना फक्त संधी देण्याची आणि विकसित करण्याची आवश्यकता आहे’, असे 19 वर्षांखालील भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविड पुढे म्हणाला.
‘माझा विश्वास आहे की आपल्याकडे काही चांगले प्रशिक्षक आहेत. ज्याप्रमाणे आपल्याकडे क्रिकेटमध्ये बरीच प्रतिभा आहे, त्याचप्रमाणे प्रशिक्षण विभागातही आपल्याकडे बरेच कौशल्य आहे,’ असे द्रविड म्हणाला.
‘आपल्याला त्यांना आत्मविश्वास देण्याची आणि विकसित करण्याची गरज आहे. मला खात्री आहे की ते हे करतील. जेव्हा आपल्यातील बर्याच जणांना आयपीएलमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही संधी मिळत नाहीत तेव्हा कधीकधी निराशा होते,’ असेही पुढे द्रविड म्हणाला.
फलंदाजीला जाण्याआधी वॉर्नर, बर्न्स खेळत होते हा खेळ, व्हिडिओ झाला व्हायरल
वाचा👉https://t.co/tWd5y5d0oI👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #AUSvsPAK #DavidWarner #JoeBurns— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019
टीम इंडियाविरुद्धच्या वनडे, टी२० मालिकांसाठी असा आहे विंडीज संघ
वाचा👉https://t.co/MTa4Dv58p2👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #INDvWI— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019