सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकत आयपीएलच्या १३व्या हंगामाची दणदणीत सुरुवात करणारा संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स. मात्र साखळी फेरीच्या अंतिम टप्प्यांत दिल्लीची गाडी डगमगताना दिसत आहे. कारण पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, मार्कस स्टोइनिस असे संघातील स्टार खेळाडू चांगले प्रदर्शन करण्यात अपयशी ठरत आहेत. त्यातही संघाचा मॅच विनर खेळाडू रिषभ पंत या हंगामात सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.
मूडीने केली पंतच्या फिटनेसवर टीका
ईएसपीएन क्रिकइन्फो वेबसाइटशी बोलताना टॉम मूडी यांनी पंतच्या खराब फॉर्मचे कारण सांगितले आहे. लॉकडाऊनमध्ये पंतने त्याच्या फिटनेसवर लक्ष न दिल्यामुळे त्याच्या फलंदाजीवर परिणाम झाला आहे. तसेच आयपीएल २०२० हंगामादरम्यान विनाकारण त्याला दुखापत झाली. यासाठीही त्याची फिटनेस जबाबदार असल्याचे मूडी यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, “मी समजु शकतो कोविड-१९ मुळे खेळाडूंना लॉकडाऊनमध्ये वेळ घालवावा लागला. दरम्यान त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागले. परंतु तुमच्या खराब प्रदर्शनासाठी तुम्ही हे असले निमित्त लावु शकत नाही. कारण सध्या तुम्ही २१व्या शतकांतील क्रिकेट खेळत आहात, ७० किंवा ८०व्या दशकांतील नाही.”
विराट कोहलीचे दिले उदाहरण
पंतच्या खराब फिटनेसला टोमणा मारत मूडी म्हणाले की, “भारतीय क्रिकेट संघाकडे विराट कोहलीच्या रुपात फिटनेसचे खूप उत्तम उदाहरण आहे. त्याने गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्या फिटनेसमध्ये खूप सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे पंतने विराटकडून काही तरी शिकायला पाहिजे. त्याच्यात केवळ शारिरिक नव्हे मानसिक बिघाडही झाले आहेत.”
खराब फिटनेसमुळे भारतीय संघातून बाहेर
पंतला त्याच्या खराब फिटनेसचे परिणामही भोगावे लागले आहेत. भारतीय संघाच्या येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघातून त्याला डच्चू मिळाला आहे. त्याच्याऐवजी केएल राहुलला मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघात स्थान मिळाले आहे. तसेच पंतच्या आयपीएल २०२०मधील आकडेवारीला पाहायचे झाले, तर त्याने आतापर्यंत १० सामन्यात केवळ २७० धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
नाईकी ऐवजी आता ‘हा’ लोगो दिसणार टीम इंडियाच्या जर्सीवर
अय्यरच्या दिल्ली सेनेला प्लेऑफमध्ये प्रवेशासाठी द्यावी लागेल अग्निपरिक्षा, अशी आहेत समीकरणे
IPL – धोनी पुढील हंगाम खेळणार, परंतु ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई संघातून बाहेर
ट्रेंडिंग लेख-
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ