रोज नवीन कल्पना घेऊन सोशल मीडिया वेबसाइट तरुणाईला भुरळ घालत असतात. त्यात ट्विटर ही वेबसाइटतर सर्वात पुढे आहे. भारतीयांचं क्रिकेटवरील प्रेम संपूर्ण जगाला माहित आहे आणि तेच प्रेम ट्विटरने आपल्या नवीन ईमोजीच्या माध्यमातून व्यक्त करायची संधी क्रिकेटप्रेमींना दिली आहे. तब्बल ३० हुन अधिक खास आयपीएल ईमोजी बनवून ह्या हंगामात आयपीएल बरोबर ट्विटरही कुठे मागे राहणार नाही.
यावेळी प्रत्येक आयपीएल संघातील ४-५ खेळाडूंच्या खास ईमोजी ट्विटरने बनविल्या आहेत. यासाठी ट्विटरचा वापर करणाऱ्यांना फक्त हॅशटॅग आणि त्याच्यापुढे त्या खेळाडूच नाव हे ट्विट मध्ये लिहायचं आहे. त्यांनंतर आपोआप त्या हॅशटॅग शब्दसमोर ईमोजी तयार होते. विराट कोहली, धोनी, रैना, स्मिथ, सुनील नारायण, गंभीर अश्या बऱ्याच खेळाडूंचे ईमोजी बनवण्यात आले आहेत. जेणेकरून त्यांचे चाहते या सोशल माध्यमातून त्यांच्याशी कनेक्ट होतील.
याबद्दल बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी म्हणाले. “आयपीलच हे खास दहावे पर्व असल्यामुळे हे आमच्या आयपील स्टारसाठी आहेत ज्यांच्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने नावारूपाला आली. आम्ही हे सर्व ईमोजी त्या स्टार्सला समर्पित करतो. आता पाहूया चाहते कश्या प्रकारे ह्या ईमोजी वापरून ट्विटरवर संभाषण करतात. ”
याबद्दलचा खास व्हिडिओ आयपीएलच्या ट्विटर अकाउंटवरून प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच ट्विटर इंडियाने हा ट्विट रिट्विट केला आहे. या ट्विटला तब्बल ६०० रिट्विट सुद्धा मिळाले आहे.
पहा काय आहेत ह्या ईमोजी…