---Advertisement---

मेगा लिलावापूर्वी एक संघ इतक्या खेळाडूंना रिटेन करू शकेल! समोर आलं मोठं अपडेट

On: शुक्रवार, ऑगस्ट 9, 2024 7:24 PM
---Advertisement---

आगामी आयपीएलपूर्वी (IPL) मेगा लिलाव होणार आहे. 18व्या आयपीएल हंगामापूर्वी सर्व संघ नव्यानं सुरुवात करण्यासाठी सज्ज असतील. आयपीएलपूर्वी बीसीसीआयनं काही निर्णय घेतले आहेत. त्याआधी बीसीसीआयनं सर्व संघ मालक यांच्यासमवेत (31 जुलै) रोजी मुंबईमध्ये बैठक घेतली होती. परंतु बैठकीनंतर लगेच काही निर्णय घेण्यात आले नव्हते. चाहत्यांना आतुरता लागली होती की, एका संघाला किती खेळाडू रिटेन करता येणार आणि आरटीएम कार्ड उपलब्ध असणार की नाही?

क्रिकबझच्या रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयनं हे स्पष्ट करु शकते की, मेगा लिलाव रद्द होणार नाही. तर एक संघ जास्तीत जास्त 6 खेळाडूंना रिटेन करु शकतो. परंतु या सर्व खेळाडूंना डायरेक्ट रिटेन करता येणार की काही खेळाडूंना आरटीएम कार्डद्वारा संघात कायम ठेवता येणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

2022 मध्ये आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला होता. त्यावेळी आरटीएमचा पर्याय उपलब्ध नव्हता. परंतु यावेळी आरटीएम कार्ड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयपीएल 2022च्या मेगा लिलावात बीसीसीआयनं (BCCI) एका संघाला 4 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी दिली होती. यावेळी बीसीसीआय मेगा लिलावापूर्वी पर्स मनी वाढवण्याची परवानगी देण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विनेश प्रकरणावर बबिता फोगाटची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाली, “हे कसलंही षडयंत्र नाही…”
“आपल्या देशात फक्त क्रिकेटलाच प्राधान्य…”, पॅरिस ऑलिम्पिकमधील निराशाजनक कामगिरीनंतर सायनाने व्यक्त केली खदखद
बाबरनं केलं सुवर्णपदक विजेत्या अर्शदचं अभिनंदन…! तरीही चाहत्यांनी केलं प्रचंड ट्रोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---