पुढील महिन्यात टी20 क्रिकेटचा महासंग्राम अर्थात टी20 वर्ल्डकप 2024 ही स्पर्धा युएसए आणि वेस्ट इंडिज येथे पार पडत आहे. या स्पर्धेसाठी पात्र संघांनी त्यांचे संघ घोषित केले आहेत. सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीग सुरु आहे. या लीगमध्ये देशोदेशीचे खेळाडू सहभागी आहेत. यात असेही काही खेळाडू आहेत, ज्यांची त्यांच्या देशाने वर्ल्डकपसाठीच्या टी20 क्रिकेट संघात निवड केली आहे. त्यामुळे आता वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर हे खेळाडू आपापल्या मायदेशी परतताना दिसत आहेत.
जोस बटलर (राजस्थान रॉयल्स), विल जॅक्स आणि रीस टॉपली (दोघे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु) हे इंग्लंडचे खेळाडूही मायदेशी परतले आहेत. इंग्लंडचा संघ 22 मेपासून पाकिस्तानविरुद्ध ट्वेन्टी-20 मालिका खेळणार आहे. त्यामुळे हे खेळाडू आता इंग्लंड संघात दाखल होतील. ( IPL Updates Moeen Ali Sam Karan Jonny Bairstow Jos Buttler returns home England )
अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी इंग्लंडला परतला असून पुढील महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पंजाब किंग्ज संघाचे 12 सामन्यांत केवळ आठ गुण असून ‘प्ले-ऑफ’च्या शर्यतीतून ते बाद झाले आहेत. त्यामुळे लिव्हिंगस्टोन मायदेशी परतल्याचा त्यांना फारसा फटका बसणार नाही.
ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठी इंग्लंड संघात निवड झालेले मोईन अली (चेन्नई सुपर किंग्ज), सॅम करन आणि जॉनी बेअरस्टो (दोघे पंजाब किंग्ज), फिल सॉल्ट (कोलकाता नाइट रायडर्स) हे खेळाडूही लवकरच ‘आयपीएल’ सोडून मायदेशी परतणार आहेत. तसेच जोस बटलर (राजस्थान रॉयल्स) हाही मायदेशी परतला आहे.
WILL JACKS AND REECE TOPLEY HAVE LEFT THE RCB CAMP. 💔
– A big setback for RCB. pic.twitter.com/gmltecVmCG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 13, 2024