२०१७ चे १० वे आयपीएल मुंबई इंडियन्सने आपल्या नावे केले. अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायन्टला १ धावांनी हरवले. मुंबई इंडियन्सने आता ३ आयपीएल रोहित शर्माच्याच नेतृत्व खाली जिंकल्या आहेत.
बक्षीस समारंभात या मोसमासातील सर्वोत्तम कामगिरीची बक्षिसं देण्यात आली. पाहुयात कोणाला कुठले बक्षिस मिळाले.
१. विवो परफेक्ट कॅच ऑफ द सिझन – सुरेश रैना ( गुजरात लायन्स )
२. येस बँक मॅक्सिमम सिक्सएस ऑफ द सिझन – ग्लेन मॅक्सवेल ( किंग्स इलेव्हन पंजाब )
३. वोडाफोन सुपरफास्ट फिफ्टी ऑफ द सिझन – सुनील नरेन ( कोलकत्ता नाईट रायडर्स )
४. व्हिटारा ब्रेझा ग्लॅम शॉट ऑफ द सिझन – युवराज सिंग ( सॅन रायझर्स हेंद्राबाद )
५. एफ बी बी स्टयलिश प्लेअर ऑफ द सिझन – गौतम गंभीर ( कोलकत्ता नाईट रायडर्स )
६. ओरंज कॅप ऑफ द सिझन – डेविड वॉर्नर ( सॅन रायझर्स हेंद्राबाद )
७. पर्पल कॅप ऑफ द सिझन – भुवनेश्वर कुमार ( सॅन रायझर्स हेंद्राबाद )
८. फेअर प्ले अवॉर्ड ऑफ द सिझन – गुजरात लायन्स
९. इमर्जिंग प्लेअर ऑफ द सिझन – बेसिल थंपी ( गुजरात लायन्स )
१०. मोस्ट वैल्यूएबल प्लेअर ऑफ द सिझन – बेन स्टोक्स ( रायझिंग पुणे सुपरजायन्ट )
या नावांच्या यादीत विजेत्या मुंबई इंडियन्सच्या एकाही खेळाडूचे नाव नाही. १० व्या मोसमातला विजेता संघ परंतु एकही वयक्तिक पुरस्कार नाही.
असे म्हणायला हरकत नाही की मुंबईची सांघिक कामगिरी इतकी उत्तम होती की कोण एकावर संघाला कधीच अवलंबून राहावे लागले नाही. हे पुरस्कार सोडले तर मुंबईकडे आज सर्वाधिक महत्वाचा पुरस्कार म्हणजे आयपीएलचा चषक आहे जो या सर्वांपेक्षा कितीतरी पटीने आनंद देणारा आणि उत्साह वाढवणारा आहे.