बेंगलोर। आयपीएलमध्ये आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूध्द दिल्ली डेअरडेविल्स असा होणार आहे. या दोन्ही संघानी चार सामने खेळले असुन तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभूत व्हावे लागले.यामुळे हे दोन्ही संघ 2 गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहेत.
बेंगलोरसाठी फलंदाजीत विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स अशी बाजू जमेची आहे पण शेवटच्या षटकातील गोलंदाजी चिंतेचा विषय बनली आहे. मुंबई आणि राजस्थान विरूध्दच्या सामन्यात सुरूवातीलाच विकेट्स घेऊनसुध्दा त्यांना या दोन्ही सामन्यात हार पत्करावी लागली होती. या दोन्ही सामन्यात शेवटच्या 5 षटकात 70 धावा मुंबई विरूध्द तर 88 धावा राजस्थान विरूध्द दिल्या होत्या.
उमेश यादव याने चार सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत तर ख्रिस वोक्सने 8 विकेट्स घेऊन जास्त विकेट्स घेणाऱ्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे.
दिल्लीकडून ग्लेन मॅक्सवेल आणि रिषभ पंत यांनी कोलकाता विरूध्दच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. यावेळी गोलंदाजीत राहूल टेवातिया याने 3 षटके टाकून 3 विकेट्स घेतल्या होत्या.
राहूल टेवातिया आणि ट्रेंट बोल्ट यांनी 4 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत. रिषभ पंत याने 20 चौकार ठोकले आहेत यामुळे तो जास्त चौकार मारण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
आजचा सामना या दोन्ही संघाना जिंकणे महत्वाचे आहे.
कधी होईल आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूध्द दिल्ली डेअरडेविल्स सामना?
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स या संघांमध्ये आयपीएल २०१८ चा तेरावा सामना आज, 16 एप्रिलला होणार आहे.
कुठे होईल आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स यांच्यातील सामना?
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स यांच्यातील आजचा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर येथे होईल. तसेच या मैदानावरच बेंगलोरचे सर्व घरचे सामने होणार आहेत.
किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स सामना?
आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स सामना आज रात्री ८.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ७.३० वाजता होईल.
कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.
आयपीएल २०१८ मधील राजस्थान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.
यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कर्णधार ), एबी डिव्हिलियर्स, ख्रिस वोक्स, ब्रेंडन मॅक्युलम, क्विंटॉन डी कॉक, उमेश यादव, युजवेंद्र चहल, मंदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, सर्फराज खान, मोहम्मद सिराज, मोईन अली कोरे अॅण्डरसन, मुरूगन अश्विन, अनिकेत चौधरी, कोलीन डी ग्रॅनधोमे, पवन देशपांडे, अनिरूध्द जोशी, कुलवंत खेर्जोलिया, पवन नेगी, पार्थिव पटेल, नवदिप सैनी, टीम साउथी, मनन वोहरा
दिल्ली डेअरडेविल्स : गौतम गंभीर (कर्णधार), अभिषेक शर्मा, अवेश खान, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, ग्लेन मॅक्सवेल, अमित शर्मा, शहाबाज नदीम, विजय शंकर, मोहम्मद शमी, ट्रेंट बोल्ट, जेसन रॉय, डॅन ख्रिस्टन, कॉलिन मुन्रो, नमन ओझा, ख्रिस मॉरीस, राहूल टेवातिया, हर्षल पटेल, पृथ्वी शॉ, जयंत यादव, संदीप लामिचाने, मन्जोत कालरा