मुंबई | आयपीएल २०१८ मध्ये ३ सामने कालपर्यंत झाले आहेत. त्यात एक गोष्ट सर्व संघात सारखीच पहायला मिळाली ती म्हणजे त्यांचा प्रत्येक मोसमातील पहिल्या सामन्याचा निकाल.
पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले. २०१३ ते २०१८ या प्रत्येक मोसमात मुंबई इंडियन्सला पहिला सामना कधीही जिंकता आला नाही. विशेष म्हणजे यापैकी ३ तीनवेळा हा संघ आयपीएल ट्राॅफी जिंकला आहे.
काल जो दुसरा सामना झाला त्यात दिल्ली डेअरडेविल्स संघावर किंग्ज ११ पंजाबने विजय मिळवला. २०१३ ते २०१८ या काळात दिल्ली डेअरडेविल्सलाही सलामीच्या सामन्याच कधीही विजय मिळवता आला नाही.
कालच झालेल्या तिसऱ्या सामन्यात राॅयल चॅलेंजर बेंगलोरला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. काल या सामन्यात राॅयल चॅलेंजर बेंगलोरकडून एबी डी विलीयर्सने चांगली फटकेबाजी केली. परंतू योगायोग म्हणा किंवा दुर्दैव.
गेल्या ११ सामन्यात राॅयल चॅलेंजर बेंगलोरकडून ज्या ज्या सामन्यात एबी डी विलीयर्सने भाग घेतला आहे त्या सामन्यात त्यांना पराभव पहावा लागला आहे.