आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे 100 पेक्षा जास्त सदस्य आहेत. यातील केवळ 12 देशांना पूर्ण सदस्याचा दर्जा असून, यातील काही देश असोसिएट नेशन तर काही अफिलिएट नेशन म्हणून काम करतात. असे असतानाच, भारतीय उपखंडातील देश व खेळाडूंची मोठी प्रसिद्धी जगभरात दिसून येते. अशातच आता मध्यपूर्वमधील प्रमुख देश मानल्या जाणाऱ्या इराणच्या प्रशिक्षकांनी थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय व भारताचे दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्याकडे मदतीची याचना केली आहे.
इराण देशात क्रिकेट खेळण्यासाठी पुरेसे योग्य वातावरण नाही. अनेकदा युद्धजन्य परिस्थिती असल्याने या ठिकाणी क्रिकेटचा तितका प्रसार झालेला दिसून येत नाही. असे असले तरी, या देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ असून ते सातत्याने खेळत असतात. इराण मध्ये खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी इराण संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक असगर अली रसुली बीसीसीआय व भारताच्या क्रिकेटपटूंकडे मागणी केली.
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले,
“मी बीसीसीआय आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला विनंती करतो की त्यांनी आमच्या खेळाडूंना व पंचांना प्रशिक्षण द्यावे. जेणेकरून आमचे खेळाडू देखील मोठ्या स्तरावर खेळू शकतील. आमच्या देशातील मुले आणि युवक हे एम एस धोनी व विराट कोहली यांच्याकडून प्रेरणा घेत असतात. ते दोघे इथे अन्य सेलिब्रिटींपेक्षा खूप जास्त प्रसिद्ध आहेत. बीसीसीआयने आम्हाला चाबहार येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बनवण्यासाठी मदत करावी.”
बीसीसीआयने यापूर्वी श्रीलंका, बांगलादेश तसेच अफगाणिस्तान या देशांना क्रिकेटच्या पायाभूत सुविधा सुरू करण्यासाठी सुरुवातीच्या काळात मदत केली होती.
(Iran Cricket Coach Wants Help From BCCI Virat Kohli And MS Dhoni)
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियावर नामुष्की! प्रथमच बांगलादेशकडून स्वीकारावा लागला लाजिरवाणा पराभव
यश धूल आणि विराटमध्ये जबरदस्त बॉन्डिंग! स्वतः भारतीय कर्णधाराने केला खुलासा