भारतात यंदा स्थानिक क्रिकेटचा संपूर्ण हंगाम खेळला जात आहे. रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफीनंतर आता इराणी कप (Irani Cup)स्पर्धा सुरू झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना सौराष्ट्र विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात शनिवारी (1 ऑक्टोबर) राजकोट येथे खेळला जात आहे. पाच दिवसाच्या या सामन्यात रेस्ट ऑफ इंडियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला आहे. या सामन्यात एका वेगवान गोलंदाजाने सौराष्ट्रच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. यामुळे त्यांचा पहिला डाव 98 धावांवरच संपुष्टात आला आहे.
मुकेश कुमार (Mukesh Kumar) या 28 वर्षीय गोलंदाजाने 7 षटकात 18 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. यावेळी सौराष्ट्रचे सात फलंदाज तर एकेरी धावांवरच बाद झाले आहेत. सौराष्ट्र संघाचे नेतृत्व जयदेव उनाडकट करत आहे. सौराष्ट्रकडून धर्मेंद्रसिंग जडेजा याने सर्वाधिक अशा 28 धावा केल्या. तर भारताची कसोटीची अभेद्य भिंत चेतेश्वर पुजारा एका धावावरच बाद झाला. त्याला कुलदीप सेन याने हनुमा विहारी याच्याकरवी झेलबाद केले.
मुकेश कुमार याने हर्विक देसाई (0), स्नेल पटेल (4), चिराग जानी (0) आणि शेल्डन जॅकसन (2) यांना बाद केले. त्याचे वडील कोलकातामध्ये टॅक्सी चालवत होते. गेल्या वर्षी रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यापूर्वी 28 वर्षीय मुकेशला ब्रेन स्ट्रोकने वडिलांना गमावावे लागले. मूळचा बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील, मुकेश तीन वेळा केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये सामील होण्यासाठी परीक्षेला बसला होता कारण त्याच्या वडिलांनी त्याने सरकारी नोकरी करावी अशी इच्छा होती.
मुकेशला क्रिकेटसाठी आपले राज्य देखील सोडावे लागले. त्याने वयाच्या 20व्या वर्षी क्रिकेटला मनावर घेतले. नाहीतर तो आधी रोज क्लब क्रिकेटकडून खेळताना पैसे कमवत होता. 2014मध्ये क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी) यांच्यासाठी पहिल्यांदा ट्रायल देताना त्याच्या खेळाला गती मिळाली. त्याने क्रिकइंफोशी बोलताना म्हटले, “माझे लक्ष्य बाकींच्यासारखेच सामन्य आहे. मला भारताचे प्रतिनिधत्व करायचे आहे.”
मुकेशला सप्टेंबरमध्ये सर्वप्रथम इंडिया ए कडून खेळण्याची संधी मिळाली. त्याने न्यूझीलंड ए विरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. हा सामना अनिर्णीत राहिला. तसेच त्याच्या मागील तीन रणजी ट्रॉफीतील कामगिरी पाहिली तर त्याने प्रत्येक वेळी 20 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी 25च्या खाली राहिली.
That's Lunch on Day 1 of the @mastercardindia #IraniCup!
4⃣ wickets for Mukesh Kumar
3⃣ wickets each for Umran Malik & Kuldeep SenRest of India bowl out Saurashtra for 98.
We will be back for the Second Session shortly. #SAUvROI
Scorecard ▶️ https://t.co/u3koKzUU9B pic.twitter.com/qQOjZeC1HB
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 1, 2022
सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्याआधी मुकेशने 30 प्रथम श्रेणीच्या सामन्यात 23च्या सरासरीने 109 विकेट्स घेतल्या. त्याने 5 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. तर 61 धावांवर 6 विकेट्स ही याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तसेच त्याने 17 लिस्ट ए मधील 17 सामन्यांमध्ये विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने बनवला खास प्लॅन! ते दोघे घेणार फलंदाजांची परिक्षा
‘भारताला दुसरा झहीर खान मिळालाय’, पाकिस्तानी दिग्गजाकडून अर्शदीपवर कौतुकाचा वर्षाव
स्टेडियमबाहेर जमलेल्या गर्दीला पंतने केले खुश! दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल