सध्या महिलांचे हक्क आणि पायाभूत स्वातंत्र हा मुद्दा पुन्हा एकदा जगाला भेडसावत आहे. ईराणमध्ये सुरु असलेली महिलांच्या हक्कांची गळचेपी आणि त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर धर्माचा मुखवटा घालून होत असेलेला हल्ला सर्वांसमोर सुरु आहे. कदाचित धर्माच्या नावावर कत्तली होण्याचा काळ सरलाय असे कित्येकांना वाटत असेल, पण हा काळ अजून संपेलला नाही. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ईराण. या देशातील हुकुमशाही व्यवस्थेने महिलांचा आवाज दडपण्यासाठी हवे तसे हातखेंडे वापरायला सुरुवात केली आहे. महिलांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी मृत्यूचे भयही दाखवले जात आहे, किंबहुना काहींना तर मृत्युच्या दरीत ढकलण्यातही आले आहे आणि काहींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. मृत्यूचे फरमान सुनावलेल्यांमध्येे इराणचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आमिर नस्र अझादनी याचा देखील समावेश आहे.
कतारमध्ये फिफा विश्वचषक 2022 दरम्यान ईराणचा संघ इंग्लंडकडून 2-6ने पराभूत झाला होता. मात्र, सामना सुरु होण्याच्या आधी ईराणच्या खेळाडूंनी राष्टगीत गाण्यास नकार दिला होता. त्यानंतर खेळाडूंच्या या कृतीला सरकारविरोधी प्रदर्शनाच्या रुपात पाहिले गेले. व्यावसायिक फुटबॉलपटू आमिर नस्र अझादनी (Amir Nasr Azadani) याला कथितरीत्या आपल्या देशातील महिलांचे हक्क आणि पायाभूत स्वातंत्र यासाठी अभियान चालवल्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावर आंतरराष्ट्रीय खेळाडूंची संघटना एफआयएफप्रो यांनी म्हटलय की ही घटना हैराण करणारी आणि घृणास्पद आहे. या संघटनेने ही फाशीची शिक्षा रद्द करण्याचे आवाहन केले आहे.
एफआयएफप्रो या संघटनेकडून एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी म्हटलय की, “आम्ही या घटनेचा कठोर शब्दात निषेध करतो. आमिर नस्र अझादनी या खेळाडूला महिलांच्या हक्कासाठी आवाज उठवल्यामुळे फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे ही आम्ही हैराण आहोत. आम्ही आमिरसोबत एकीने उभे आहोत आणि तात्काळ त्याची शिक्षा मागे घेण्याचे आवाहन करतो.”
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार आमिर नस्र अझादानी हा आपल्या देशातील महिलांच्या अधिकारासाठी अभियान चालवत होता. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 22 वर्षीय महसा अमीनी या महिलेच्या मृत्यूनंतर ईराणमधील वातावरण चिघळले होते. महसा अमिनी हीची सप्टेंबर 2022मध्ये पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर ईराणमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारविरोधी आंदोलने झाली.(Iranian Football player Amir Nasr Azadani sentenced to death for supporting women freedom and fundamental rights in Iran)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुजारा-अय्यरच्या भागीदारीमुळे भारत सुस्थितीत! पहिल्या दिवशी संघाची धावसंख्या 250 पार
नशीब असावं तर असं! क्लिन बोल्ड होऊनही बाद झाला नाही श्रेयस अय्यर, पाहा व्हिडीओ